स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना सरपंच सेवा संघाचा "राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार" !

(सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र्र राज्य यांच्या वतीने २०२३ चा दिला जाणारा "राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार "स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना प्रदान करतांना सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे, सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे आदी.)

नगर ( प्रतिनिधी):- दि 26 /12 /2023 - सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा २०२३ चा "राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार" स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना प्रदान करण्यात आला. 

अहमदनगर येथील माउली संकुल सभागृह येथे हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधर संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे, सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पदक, फेटा असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. उद्धव शिंदे यांनी रक्तदान, गरीब गरजूंना मोफत ब्लँकेट, टोपी, छत्री वाटप, गरिब मुलांना शालेय साहित्याचे वाटप, याचबरोबर गोरगरीब जनतेला कपडे,  असे समाजोपयोगी उपक्रम राबवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी अमोल बास्कर, निशांत पानसरे आदी उपस्थित होते.

{राज्यस्तरीय पुरस्कारामुळे सामाजिक कार्यास बळ मिळेल 

स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने आज पर्यंत विविध सामाजिक, शैक्षणिक या क्षेत्रातील वंचित उपेक्षितांना स्वार्थ भावनेने मदत केली आहे. तर गोरगरिबांचे उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात संरक्षण व्हावे यासाठी छत्री व उबदार कपड्यांचे वाटप शहरातील विविध भागात केले. यामागे पुरस्कार मिळवण्याचा उद्देश नव्हता, मात्र त्यातून आत्मिक समाधान मिळत होते. आमच्या या कार्याची दखल घेत सरपंच सेवा संघाने दिलेला "राज्यस्तरीय पुरस्कार" निश्चितच आनंददायी आहे, या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी दिली. }


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !