नगर पुणे महामामार्गावर चास शिवारात खाजगी बसला अपघात ! अपघातग्रस्त बसमधून 33 प्रवाश्यांची सुखरूप सुटका...

 


नगर ( प्रतिनिधी) - तालुक्यातील नगर पुणे महामार्गावर चास  गावाच्या पुढे असणाऱ्या वळणावर खाजगी आराम बसला मंगळवारी (दि.३०) सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. खाजगी आराम बस भरधाव वेगात असल्याने बस चालकाला वळणाचा  अंदाज न आल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून बस रस्त्यावरच उलटली. या बस मध्ये अंदाजे ३३ प्रवासी होते. ते सुदैवाने या अपघातातून बालंबाल बचावले असून अपघातग्रस्त बसमधून सुखरूप सुटका करण्यात आली. बसचा क्लीनर गंभीर रित्या जखमी झाला असल्याचे समजते.

        छत्रपती संभाजीनगर कडून नगर मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या बिंदुसरा एक्सप्रेस नावाच्या (क्र.एम.एच.२०, डी.डी. ०२२३) या खाजगी बसला अपघात झाला आहे. बस महामार्गावर उलटल्या नंतर प्रवाशांनी मोठा आरडाओरडा केला असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते. बसमधील अनेक प्रवासी हाताला व डोक्याला मार लागून किरकोळ जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच कामरगाव येथील मृत्युंजय दूत सिद्धांत आंधळे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना त्यांनी तात्काळ बाहेर काढत किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना चास येथील रुग्णालयात हलविले तर गंभीर जखमी झालेल्या क्लीनरला उपचारासाठी नगरला हलविण्यात आले.

तसेच बस रस्त्यावर उलटल्या नंतर बसच्या एका बाजूला आगही लागली होती. मात्र सिद्धांत आंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधाना मुळे बसला लागलेली आग आटोक्यात आली आणि सर्व प्रवाशी बालंबाल बचावले आहेत. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता, बस रस्त्यावर उलटल्याने नगर पुणे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी  निमगाव वाघा येथील क्रेन मालक डोंगरे यांनी तातडीने अपघात स्थळी क्रेन पाठवून क्रेनच्या सहाय्याने बस रस्त्याच्या बाजूला करत सर्व वाहतूक सुरळीत केली. महामार्ग पोलीसांना घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनीही चास शिवारात घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. व महामार्गावरील वाहतुक काही वेळात सुरळीत करण्यात आली.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !