महाराष्ट्र पोलीस दिना निमित्त पोलीस दलाचा स्नेहबंध फौंडेशनतर्फे सत्कार...

नगर( प्रतिनिधी) - २ जानेवारी हा दिवस "महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन" म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत 'सदरक्षणाय, खलनिग्रहणाय' हे ब्रीद जपणार्‍या कर्तव्यनिष्ठ पोलिस दलातील दिवस-रात्र कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कामासाठी सलाम केला जातो. स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला व सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह पोलीस दलातील बांधवांना खास शुभेच्छा देत त्यांच्या खाकी वर्दीला सलाम केला आहे. यावेळी निशांत पानसरे, दीपक सरोदे, पो.अक्षय भोसले, पो.दिगंबर तनपुरे, पो.राहुल बोडखे, पो.अजय गव्हाणे आदी उपस्थित होते.*

      यावेळी डॉ. शिंदे म्हणाले २ जानेवारी १९६१ रोजी भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !