कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम संपन्न.
नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :- महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत मुळा शिक्षण संस्थेच्या सोनई ता. नेवासा येथील कृषि महाविद्यालयात माध्यमातून
कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२३-२४ यानिमित्ताने अंमळनेर येथे
कृषि कन्या चैताली निचित, प्रतिक्षा शिंदे, ऋतुजा पोटरे, अश्विनी पवार, सोनाली मुळे यांचे ग्रामीण कृषि जागरूकता आणि अंमळनेर येथील ग्रामस्थांनी कृषि कन्यांचे स्वागत केले. ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाच्या दोन महिन्यांच्या कालावधीत कृषि कन्या शेतीविषयक विविध प्रात्यक्षिक घेणार आहे आणि शेतकऱ्यांचे प्रबोधन करणार आहेत. या वेळी अंमळनेर गावचे सरपंच ज्ञानेश्वर आयनर, उपसरपंच किशोर मोरे, मुळा कारखान्याचे संचालक कर्णसाहेब पवार, पोलीस पाटील अनिल मकोणे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब जिवरक व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कृषि महाविद्यालय, सोनईचे प्राचार्य डॉ. एच. जी. मोरे , उपप्राचार्य प्रा. एस. व्ही. बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. ए.ए.दरंदले, कार्यक्रम अधिकारी डॉ. पी.आर.गिरी यांचे कृषि कन्यांना मार्गदर्शन लाभत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा