कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे नेणारा आरोपी जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडक कारवाई !

नगर (प्रतिनिधी):- नगर तालुका पोलीसांनी कत्तलीसाठी घेवून जाणारे गोवंशीय जातीचे जनावरे व वाहन पकडून ५,२२,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला जेरबंद केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुका पोलीस स्टेशनचा नव्याने कारभार हाती घेतलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, हे त्यांची टीम पोसई युवराज चव्हाण, पोहेकॉ रायचंद पालवे, सफौ/दिनकर घोरपडे, पोकों/जयदत्त बांगर, पोकों/विजय साठे हे पो.स्टे अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पो.स्टे हद्दीत रवाना झाले होते . २७/०१/२०२४ रोजी ०५/३० वा. सपोनि प्रल्हाद गिते साहेब, पोसई  दरम्यान सपोनि प्रल्हाद गिते साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अरणगाव शिवारात एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीमधे गोवंश जनावरांची वाहतूक करीत आहेत अशी खात्री लायक बातमी मिळाल्याने आंम्ही पोसई चव्हाण यांना सदर कारवाई करणेकामी दोन पंचांना बोलावून घेणेबाबत तोंडी आदेश दिल्यावरुन त्यांनी दोन पंचांना बोलावून घेतले सदर ठिकाणी आंम्ही पोलीस स्टाफसह सापळा लावून अरणगाव कडून अहमदनगर कडे एक संशयीत पिकअप जाताना दिसल्याने सदर वाहनास थांबवून आंम्ही वाहनाजवळ जावून वाहनाची पाहणी केली असता सदर पिकअप वरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने जावेद बबन पठाण रा. वाळकी ता. जि. अहमदनगर असे सांगून त्याचे ताब्यातील पिकअप गाडी नं.MH १६ CC ०६७१ मधे कत्तलीसाठी घेवून जात असलेल्या दोन जिवंत गाई मिळून आल्या सदर ठिकाणी दोन पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला आहे सदर

कारवाई दरम्यान खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला आहे. ११५,००,०००/- रु.कि.चा एक पांढऱ्या रंगाचा महिंद्रा पिकअप नं. MH १६ CC ०६७१ असा असलेला किं. अंदाजे.

२)१०,००० / रु.कि.ची एक पांढ-या रंगाची गावरान गाय

३)१२,००० /- रु.कि.ची एक काळया रंगाची जर्सी गाय

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला व अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे. उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, नगर तालुका पोलीस स्टेशन, पो.उप.नि. युवराज चव्हाण, पोहेकॉ रायचंद पालवे, सफौ/दिनकर घोरपडे, पोकों/जयदत्त बांगर, पोकों/विजय साठे यांचे पथकाने केली आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !