द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य प्रेरणादायक- बाबासाहेब बोडखे

नगर तालुका प्रतिनिधी:- 

द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन माध्यमिक शिक्षक भवन अहमदनगर येथे माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष समीर मणियार हे होते तर नगर शहर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांची प्रमुख उपस्थित होती. 

यावेळी बोलताना बोडखे म्हणाले, 'द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायक असून ही पत्रकार संघटना नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांमधून तसेच सामाजिक कामातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करते.

पत्रकारांवर झालेल्या अन्याय अत्याचारा विरोधात लढणारी संघटना म्हणून द युवा ग्रामीण पत्रकार संघाकडे पाहिले जाते.पत्रकार हा समाजाचा आरसा असून पत्रकारांनी सर्वसामान्य जनतेसाठी कसे लढावे हे या संघटनेच्या माध्यमातून पाहावयास मिळते.'असे मत व्यक्त केले

यावेळी नगर शहर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी पत्रकार संघाचे कौतुक करत पत्रकारांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांनी संघटनेविषयी माहिती दिली. त्याचबरोबर ग्रामीण पत्रकारांना येणा-या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाचे आभार प्रदेश कार्याध्यक्ष श्याम कांबळे यांनी मानले.

यावेळी द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य खजिनदार रफिक शेख , जिल्हा कार्याध्यक्ष श्याम काळपुंड,नगर तालुकाध्यक्ष हेमंत साठे नगर तालुका उपाध्यक्ष सागर कांबळे , जिवाजी लगड, दक्ष पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक शहादेव मुंगसे, जावेद सय्यद, बाबासाहेब तिपोळे ,संतोष जाधव, रियाज शेख, शिवा मस्के, प्राचार्य बाबासाहेब शिंदे, प्राचार्य जयंत गायकवाड ,उद्योजक राजेंद्र बोडखे, अजय भिंगारदिवे,आलमगीर येथील मातोश्री उर्दु हायस्कूलचे तौफिक शेख आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !