सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

 

नगर (हेमंत साठे):- पारनेर तालुक्यातील सुपा गावच्या विकासासाठी उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल सरपंच मनिषा रोकडे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी की, स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य  यांच्यातर्फे राज्यस्तरीय विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार सोहळा रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी माऊली सभागृह, सावेडी अहमदनगर या ठिकाणी संपन्न झाला. स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्याकडून देण्यात येणारा आदर्श सरपंच पुरस्कार सुपा गावच्या सर्वांगीण विकासात मोलाची भुमिका बजावत अग्रेसर राहणाऱ्या सरपंच मनिषा योगेश रोकडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, मा. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, समाजसेवक यादवराव पावसे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

     यावेळी सोमनाथ रोकडे, जाधव  स्मिता , वर्षा घुले,राणी रोकडे,सविता ठोकळ,सुमन रोकडे, क्षितीजा रोकडे, यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         सुपा गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सरपंच मनिषा योगेश रोकडे यांना आदर्श सरपंच पुररस्कार मिळाल्याबद्दल सुपा पंचक्रोशी सह पारनेर तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !