मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नगर- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको !
नगर प्रतिनिधी :- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला नगर तालुक्यातील दहिगाव साकत वडगाव तांदळी, वाटेफळ, साकत खुर्द, येथील तरुणांनी आज सकाळी (दि.१७) रोजी नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक '५१६अ" अडऊन रास्ता रोको आंदोलन केले. या मध्ये शिराढोण गावचे उपसरपंच दादासाहेब दरेकर, यांनी मराठा समाजाला आरक्षण किती महत्त्वाचे आहे या विषयी मनोगत व्यक्त केली. तसेच जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी देखील जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच दहिगाव सरपंच मधुकर म्हस्के यांनी जो पर्यंत मराठा आरक्षण मिळतं नाही तोपर्यंत जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ कायम ठाम उभा आहोत असे स्पष्ट केले. तसेच साकत खुर्द सरपंच डॉ नंदकुमार पवार यांनी एक मराठा लाख मराठा हे उभा महाराष्ट्र हे आंदोलन चालू आहे. त्यात आम्ही सहभागी आहोत हे हि स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या या अमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा म्हणून साकत खुर्द येथील मराठा व इतर जाती धर्माच्या बांधवांनी देखील जाहीर पाठिंबा या ठिकाणी येऊन दर्शविला नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त केला. उपोषणाच्या दरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालेली असून शासनाने या वर अद्याप कुठल्याही प्रकारचा तोडगा काढलेला नाही. मराठा समाज आक्रमक झाला आहे. या वेळी आंदोलन कर्त्याकडुन नगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले, पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना लेखी निवेदन देण्यात आले.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, शिराढोण उपसरपंच दादासाहेब दरेकर, दहिगावचे सरपंच मधुकर म्हस्के, रामदास चितळकर, यांनी भाषण केली व मराठा समाजाचे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे हे स्पष्ट केले.
या प्रसंगी साकत चे सरपंच डॉ नंदकुमार पवार, उपसरपंच बाळासाहेब चितळकर, ग्रा. पं. सदस्य रामदास चितळकर, मोहन वाघमोडे, डॉ विशाल बोचरे, श्रीधर पवार, संभाजी पवार , पोपट पवार, पोपट चितळकर, रामदास दरेकर, गोवर्धन पवार, अविनाश पवार, संपत वाघमोडे, अशोक मुंगसे, नागेश वाघ, उद्धव शिंदे, शिवाजी बोचरे, महेश पवार, आदेश दरेकर, सागर शिंदे, नवनाथ बोचरे, प्रविण पवार, माजी उपसरपंच महेश म्हस्के, अनशाबापु म्हस्के, उपस्थित होते
पोलीसांचा चोख बंदोबस्त
*साकत खुर्द येथे सकाळ पासून मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. रास्ता रोको आंदोलनला कुठेही हिंसक वळण लागु नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली नगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले, नगर तालुका पोलीस ठाण्याचे साह्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, व त्यांचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मराठा आरक्षण संर्दभात साकत खुर्द येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनला साकत खुर्द गावातील धनगर बांधवानी जाहीर पाठिंबा देत आंदोलन सहभाग नोंदवला साकत गावात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होत असतात त्यांमुळे या रास्ता रोको आदोलना वेळी ऐकीचे दर्शन घडले तसेच मराठा आरक्षण मिळाले पाहिजे हे आपल्या भाषाणातुन देखील संदेश दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा