सुपा गावात "स्वप्नांपुढे गगन ठेंगणे" उपक्रम उत्साहात संपन्न ! सरपंच मनिषा रोकडेंची अभिनव संकल्पना.
पारनेर(प्रतिनिधी) :- पारनेर तालुक्यातील सुपा गावातील आदर्श सरपंच मनिषा योगेश रोकडे यांच्या अभिनव संकल्पनेतून अनेक उपक्रम गावात राबविण्यात येतात. यातील वाखाणण्याजोगा व इतर गावांना आदर्शवत ठरणारा एक उपक्रम म्हणजे गावच्या आदर्श सरपंच सौ. मनिषा योगेश रोकडे यांच्या प्रेरणेतून व सहकार्यातून साकारलेले जि. प. प्रा. शाळा सुपा मराठी व उर्दू शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दि. १५ / ०२ / २०२४ रोजी पाहताना खरंच वाटत होतं स्वप्नांपुढे गगन ठेंगणे !
या कार्यक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष होते.
मुलांचे कलाविष्कार हे खूपच वाखाणण्याजोगे होते . कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सौ.मनिषा रोकडे यांनी स्वतः जि. प. च्या शाळेत शिकल्याचे अभिमानाने उल्लेख केला .
कार्यक्रमात विविधतेसोबतच शिक्षकांचा अभ्यासू पणाही प्रकर्षाने जाणवला . गणेशवंदनाने सुरुवात झालेल्या कार्यक्रमात कव्वाली, शिवछत्रपती वंदना , भरतनाट्यम , बॉलीवूड सॉंग , रामागमन , चांद्रयान मोहीम , लावणी अशा प्रकारे सर्व अंगांना स्पर्श करणारे कलाविष्कार समाविष्ट होते .
प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले ते " भारताच्या चांद्रयान मोहीमेवर " सादर केलेल्या कार्यक्रमाने. या नाटिकेस प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत सलामी दिली . संपूर्ण कार्यक्रमावर प्रेक्षकांनी बक्षिसांची लयलूट करून बालचमूंना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील राष्ट्रीय पातळीवर , राज्य पातळीवर , तालूका पातळीवर तसेच केंद्रस्तरावर उत्तुंग कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला . शाळेच्या गुणवत्तेविषयी सर्वांनी समाधान व्यक्त केले .यामध्ये प्रमुख उपस्थिती शिक्षण अधिकारी अशोकराव कडूस त्याचप्रमाणे सुपा पोलीस स्टेशनचे पीआय अरुण आव्हाड पीएसआय मॅडम, पारनेर तालूका दूध संघाचे अध्यक्ष श्री. दत्ता नाना पवार व गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच विजय पवार, धडाडीचे युवा उदयोजक श्री. योगेशभाऊ रोकडे , तंटामुक्तीचे अध्यक्ष बी.एस. पवार त्याचप्रमाणे पारनेर पं. स. चे शि. वि. अ. श्री.लाळगे साहेब , केंद्रप्रमुख श्री. पवार साहेब, मा.केंद्रप्रमुख श्री. साबळे साहेब , श्री.कोल्हे साहेब सर्वच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी , व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते ,मुख्याध्यापक , शिक्षक पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.
{दिनांक 15 फेब्रुवारीला जिल्हा परिषद गावठाण शाळा व उर्दू शाळा यांचे स्नेहसंमेलन झाले असून ते अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाले. त्याचप्रमाणे आपण 17 तारीख जिल्हा परिषद जांभूळ वस्ती शाळा व , कोल्हे वस्ती शाळा त्याचप्रमाणे 19 तारखेला शिवजयंती दिवशी पवारवाडी शाळा खडकवाडी शाळा व डोंगरवाडी शाळा असच स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम करणार आहोत. या उपक्रमान गावातील विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळणार असून यातून मिळणाऱ्या प्रोत्साहनातून त्यांचे मनोबल निश्चितच वाढणार आहे.}
सौ.मनिषा योगेश रोकडे (सरपंच.सुपा)
(बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा