महिला सरपंचाला मारहाण करणारे आरोपी एम.आय.डी.सी. पोलीसांनी २४ तासात केले गजाआड !

 


नगर ( प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील शेंडी येथील महिला सरपंचांना मारहाण करणाऱ्या आरोपींना नगर एम.आय.डी.सी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 24 तासाच्या आत अटक केली आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  दिनांक 15/ 02/ 2014 रोजी 4 वा सुमारास एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन अंतर्गत जेऊर दूरक्षेत्र हद्दीत शेंडी गावचे सरपंच या गावातील कचरा टाकण्याकरिता नेटके वस्ती येथे खड्डा करत असताना तेथे आरोपी रावसाहेब यादव नेटके, गणेश गोरख ससाने, बॉबी नेटके, दीपक नेटके, अतुल नेटके, राणा नेटके सर्व राहणार शेंडी हे तेथे आले व यांनी फिर्यादीस इथे खड्डा करायचा नाही असे सांगितल्याने फिर्यादी यांनी खड्डा बुजविला असता आरोपी रावसाहेब नेटके याने फिर्यादीस तू लय कामवाली झालीस असे म्हणून घाण घाण शिवीगाळ केली केली व फिर्यादीच्या गालावर चापट मारली तसेच फिर्यादीला लज्जास्पद होईल असे अंगाला स्पर्श केला व उर्वरित आरोपींनी फिर्यादीच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आहे असे फिर्यादीवरून एमआयडीसी पो.स्टे. गु.र. नं. 148/2024

 भा द वी कलम 354,324,323,427,504,143,147,149 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी राऊ उर्फ रावसाहेब यादव नेटके  व गणेश गोरख ससाणे याना अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,सपोनि माणिक चौधरी सो पोसई योगेश चाहेर,पोहेका थोरवे पोहेका राजेंद्र सुद्रिक, पोकॉ किशोर जाधव,पोकॉ जयशिंग शिंदे,पोका भगवान वंजारी, पोका सूरज देशमुख,नवनाथ दहिफळे,नंदकुमार सांगळे, पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक  योगेश चाहेर हे करत आहेत

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !