सुपा सरपंच मनिषा योगेश रोकडे यांनी भागवली वन्यजीवांची तृष्णा !सलग पाच वर्षापासून रोकडे यांचा प्रेरणादायी उपक्रम.
पारनेर (प्रतिनिधी):- उन्हाळा सुरू झाला की वन्यप्राण्यांची पाण्याची सोय नसल्या कारणाने पाण्यासाठी वणवण सुरू होते. ऐन उन्हाळयात मुक्या जीवांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकावे लागत असून, गेल्या पाच वर्षापासून सुपा गावच्या सरपंच मनिषा रोकडे या मुक्या जीवांची तृष्णा भागवत आहेत.
दरवर्षी वर्षी कडक उन्हाळ्यात वन्यजीवांना पाणी लागते. पाणवठयात पाणी सोडले पाहिजे असते,
तालुक्यात वन्यप्राण्यांसाठी वन विभागाने अनेक गावात पाणवठे तयार केले आहेत. परंतु वन अधिकारी, वन कर्मचारी या गावात पाणवठ्यात पाणी सोडत नाही. अशी वन्यप्रेमींची तक्रार असते. प्रत्येक वर्षी उन्हाळा आला की अधिकारी त्या पाणवठ्याची तात्पुरती डागडूजी करतात व नागरीकांमधून थोडीफार ओरड झाल्यावर पाणी सोडतात, हे नेहमीचे चित्र झाले आहे. पावसाळा व हिवाळ्यात नैसर्गिक स्रोतामुळे या वन्यजीवांना पाणी लागत नाही, परंतू उन्हाळ्याचे चार ते पाच महिने वणवण करावी लागत असते. फेब्रुवारी महिना संपला की,उन्हाची तीव्रता जाणवू लागते.
नैसर्गिक जलस्रोत आटले किंवा विहिरी, बोअरवेलचे पाणी संपले की प्राणी वाडी-वस्त्यांकडे पाण्याच्या शोधात निघतात. वनविभागाच्या वतीने जंगलामध्ये वनक्षेत्रात पाणवठे तयार केलेत तर त्यात पाणी सोडण्याची तसदी का घेत नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सरपंच मनिषा रोकडे व त्यांचे पती योगेश रोकडे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत.हंगा, शहाजापूर येथील जंगलातील पाणवठयात बारा हजार लिटर पाणी सोडून मुक्या जीवांना मोठा दिलासा दिला आहे. सापंच रोकडे या गेल्या पाच वर्षापासून वा मुक्या जीवांची तहान भागवत आहेत. परंतु वन विभागासाठी यासाठी कायमची सातूद का करत नाही, याबाबत वन्यप्रेमींकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. वन्य पाणवठयांमधे पाण्याची सोय करण्यात आली. यावेळी सुपा सरपंच मनिषा योगेश रोकडे, माजी उपसरपंच दत्ता नाना पवार, ग्रामपंचायत सदस्य अनिता पवार, पप्पू पवार, पत्रकार मार्तंडराव बुचुडे, सुरेंद्र शिंदे, संतोष ढवळे, कृष्णा कोल्हे, शुभम गायकवाड स्वराज रोकडे आदी उपस्थित होते.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा