चिचोंडी पाटील येथील राजू कोळी यांच्या घराच्या जळीताची सखोल चौकशी व्हावी. - सरपंच शरद पवार


नगर( प्रतिनिधी):- तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील नगर जामखेड रस्त्यालगत बस स्थानक शेजारी राजू कोळी यांच्या घराला आज पहाटे पाचच्या दरम्यान आग लागल्याने संपूर्ण घर  जळून खाक झाल आहे. राजू कोळी व पत्नी पुढच्या खोलीत झोपले होते त्यामुळे त्यांना या घटनेत इजा झाली नाही परंतु घरातील वस्तूंचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते.

सदर घटनेत आग घराच्या मागच्या बाजूने लागल्याने त्यांच्या घरातील गुरुपयोगी वस्तू टीव्ही फॅन कूलर मिक्सर कपडे व इतर वस्तूंची जळून खाक झालेली आहे,


राजू कोळी राहत असणाऱ्या घराची जागा वादग्रस्त असल्याने सदर जळीत संशयास्पद आहे,

त्यामुळे या घराच्या जळीताची सखोल चौकशी करण्यात यावी असे कोळी परिवार व सरपंच यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे.



सदर घटनास्थळी सरपंच शरद पवार, पोलीस पाटील संतोष खराडे, पत्रकार बाळासाहेब गदादे व कोळी परिवाराचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते, थोड्याच वेळात नगर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल होऊन सदर घटनेची सखोल चौकशी करणार असल्याचे पोलीस पाटील यांनी सांगितले,

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.