गावठी पिस्तूल बाळगणारा आरोपी गजाआड ! भिंगार कॅम्प पोलीसांची कारवाई !


नगर (प्रतिनिधी):- दिनांक २६/०४/२०२४ रोजी गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणारा आरोपी भिंगार कॅम्प पोलीसांकडून जेरबंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.२५/०४/२०२४ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम हा त्याचे कंबरेला गावठी कटटा (अग्नीशस्त्र) लावुन बु-हाणनगर रोडवरील दमडी मशिद जवळ संशयास्पद फिरत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना तात्काळ सदर ठिकाणी जावुन स्वताची सुरक्षितता बाळगुन प्राप्त माहिती आधारे सदर ठिकाणी दोन प्रतिष्ठीत पंचांना घेवुन जावुन खात्री करुन व काही आक्षेपार्ह मिळुन आल्यास त्याचेवर कारवाई करा असा तोंडी आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सदर ठिकाणी जावुन दमडी मशिदजवळ जावुन पाहणी केली असता तेथे एक इसम संशयास्पद फिरतांना दिसुन आल्याने पंचांची व पोलीसांची खात्री होताच त्यास जागीच ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत कंबरेला खोसलेला एक २५२००- रु किं चा लोखंडी पिस्टल मॅगजिन गावठी बनावटीचा कटटा (अग्नीशस्त्र) व दोन जिवंत काडतुस असे आरोपी जाबीर सादिक सय्यद वय-३४ वर्षे रा. घर नं.-६ शहा कॉलनी, गोविंदपुरा, अहमदनगर याच्या कब्जात मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरोधात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे पोकों/ संदिप थोरात यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर ४४३/२०२४ आर्म अॅक्ट ३/२५ सह महा.पो.का.क.३७ (१) (३) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे हे करत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरु, पोलीस अंमलदार रेवणनाथ दहिफळे, कैलास सोनार, संदिप घोडके, दिपक शिंदे यांच्या पथकाने केली

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.