बारा वर्षानंतर निवृत्त शिक्षिकेस सोन्याचे गंठन मिळाल्याने...आनंद गगणात मावेना. कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व टीमचे कौतुक !


याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २६ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ०६.३० वा. सुमारास नगर-पुणे महामार्ग नजीक आरती हॉटेल समोरुन सौ. सुनिता सोन्याबापू सोनवणे रा. शाहुनगर, केडगांव अहमदनगर या शिक्षिका २६ जानेवारी निमित्त झेंडावंदन कार्यक्रमा करीता त्यांचे दुचाकी वरुन १०८ महंत पंडीत माध्यमिक विदयालय, नुतन कन्या शाळा, अहमदनगर येथे जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या सोनसाखळी चोरांनी त्यांचे गळ्यातील ०१ तोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठन ओढून चोरुन नेले होते. त्यावरुन त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्याने कोतवाली पोलीस ठाणे गुन्हा रजिष्टर नंबर ३०/२०१२ भादंविक. ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवुन सदर गुन्हयाचे तपासामध्ये पोलीसांनी आरोपी अटक करुन तपासामध्ये यातील फिर्यादी सौ. सुनिता सोन्याबापू सोनवणे यांचे गळयातील १ तोळा वजनाचे सोन्याचे गंठन सन २०१२ मध्ये हस्तगत करण्यात आले होते.

        सुमारे १२ वर्ष उलटुनही यातील फिर्यादी सौ. सुनिता सोन्याबापू सोनवणे, सेवानिवृत्त शिक्षिका, रा.शाहुनगर, केडगांव अहमदनगर यांचे १ तोळा वजनाचे सोन्याचे गंठन त्यांना परत मिळाले नव्हते. तसेच अश्या प्रकारचे बऱ्याच फिर्यादींचा गुन्हा दाखल होवुन मुददेमाल जमा झालेला असतांना फिर्यादी यांचे मोबाईल नंबर तसेच राहण्याचा पत्ता बदलल्याने सदरचे जमा झालेले सोन्याचे दागिने परत करण्या करीता मोठी अडचण निर्माण होत असल्याने कोतवाली पोलीसांकडुन अशा तक्रारदारांची यादीसह दिनांक ०९/१०/२०२३ रोजी प्रेसनोट जारी करण्यात आलेली होती. सदर बाबत पोहेकॉ शेख तनवीर व महीला पोकों/जयश्री सुद्रीक अशांनी मोठे परिश्रम घेत अशा प्रकारचे तक्रार यांचे नांवे, पत्ते, संपर्क नंबर शोधुन काढुन त्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगुन मा. न्यायालयाचे आदेशान्वये बऱ्याच लोकांना त्यांचा किमती मुददेमाल कायदेशीर कामकाज पुर्ण करुन परत करण्यात आला.

त्याप्रमाणे मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर मा. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक २५/०४/२०२४ रोजी श्री. प्रताप दराडे, पोलीस निरीक्षक, यांनी पोहेकों/शेख तनवीर व महीला पोकों/जयश्री सुद्रीक यांचे मदतीने यातील फिर्यादी सौ. सुनिता सोन्याबापू सोनवणे रा. शाहुनगर, केडगांव अहमदनगर यांचा शोध घेवुन त्यांनी दिनांक २६/१२/२०१२ रोजी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने जप्त केलेले १ तोळा सोन्याचे गंठन त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यावेळी यातील तक्रारदार सौ. सुनिता सोन्याबापू सोनवणे यांचा आनंद गगनात मावत नव्हता, त्यांनी पोलीस निरीक्षक श्री. प्रताप दराडे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !