मातोश्री वृद्धाश्रमात 'स्नेहबंध'तर्फे मतदार जनजागृती ; मतदान करणे म्हणजे संविधानाचा सन्मान राखणे : डॉ. उद्धव शिंदे*
(मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक व महिलांशी संवाद साधून मतदानाबाबत जनजागृती करताना स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे.)
नगर (प्रतिनिधी):- मातोश्री वृद्धाश्रमात 'स्नेहबंध'तर्फे मतदार जनजागृती अहमदनगर : वाईट, भ्रष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींचा संसदेतला, विधिमंडळातला भरणा रोखायचा असेल तर भारतीय संविधानातून घटनाकारांनी आपल्याला एक भेदक अस्त्र बहाल केलंय ते म्हणजे मतदान! मतदान करणे म्हणजे संविधानाचा सन्मान राखणे होय, असे स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले. विळद येथील मातोश्री वृद्धाश्रमात स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात आली. या वृद्धाश्रमात सुमारे ४५ वृद्ध पुरुष व महिला आहेत. दिलीप चोरडिया या वृद्धाश्रमाचे काम पाहतात. येथील वृद्धांशी स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. शिंदे यांनी संवाद साधला. त्यांनी या ज्येष्ठ पुरुष व महिलांना मतदानाबाबत विचारले असता त्यांनी आम्ही मतदानाला जातो, असे सांगितले. डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, राष्ट्रहितासाठी मतदान करायचं .., लोकशाहीचा सन्मानासाठी .,१०० टक्के करायच मतदान.., असे सांगून या वृद्धाश्रमातील नागरिकांना मतदान करण्याबाबत सांगितले. यावर या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सांगितले की, आम्ही मतदानाला जातोच. आणि मतदानही करतो. वृद्धाश्रमात येऊन मतदानाबाबत जागृती केल्याबद्दल व संवाद साधल्याबद्दल डॉ. उद्धव शिंदे यांचे आभार मानले.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882
Advrt
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा