लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यात पोलीसांचा रुटमार्च.
नगर ( प्रतिनिधी):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने नगर तालुका पोलीस स्टेशन तसेच राज्य राखीव पोलीस बल यांचा संयुक्त रुटमार्च घेण्यात आला.
यावेळी नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमधे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला व उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस अंमलदार व राज्य राखीव पोलीस अधिकारी तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १२ यांनी आज दिनांक ३० एप्रिल रोजी नगर तालुक्यातील कामरगाव, अरणगाव ,वाळकी, चिचोंडी पाटील चास, नेप्ती या गावामधे रूट मार्च घेण्यात आला. या रुटमार्च मधे नगर तालुका पोलीस स्टेशनचे स. पोलीस निरीक्षक यांच्या सोबत पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग, जयेश गांगुर्डे आदींसह गुप्तवार्ता विभागाचे सोमनाथ वडणे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल थोरात, सचिन वणवे, संभाजी बोराडे, गांगर्डे, महिला पोलीस हवालदार मोहिनी कर्डक, व राज्य राखीव पोलीस बलाचे कर्मचारी सहभागी होते.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882
Advrt
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा