महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !



नगर (प्रतिनिधी):- पारनेर नगर मतदार संघाचे माजी.आमदार व शिवसेनेचे उबाठा गटाचे नेते विजय औटी यांनी मंगळवारी  तालुक्यातील निवडक शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक घेत लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांची भूमिका समजावून घेतली. सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत  १ मे रोजी पारनेरमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत घोषणा करु असे विजय औटी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार माजी आमदार विजय औटी यांनी आपली भूमिका स्पष्टपणे जाहिर केली आहे.

नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पारनेर शिवसेनेकडून कोणतीच भूमिका स्पष्टपणे घेतली गेली नसल्याचे चित्र होते.  आपण आपली भूमिका जाहीर केली पाहिजे अशी मागणी कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांकडून करण्यात आल्यानंतर औटी यांनी मंगळवारी निवडक पदाधिकार्‍यांची बैठक घेतली होती.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेत मा. आमदार विजय औटी यांनी अंतिम निर्णय आपण दि. १ मे रोजी जाहीर करू आणि हाच आपण सर्वांचा निर्णय असेल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. औटी यांची भूमिका नगर लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याने ते काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून होते.

त्यामुळे आज दि.१ मे रोजी  माजी. विधानसभेचे उपाध्यक्ष तथा मा.आमदार विजय औटी यांनी आपली भूमिका जाहीर करत महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच औटी यांनी विखे यांना पाठिंबा दिल्यामुळे माजी आमदार निलेश लंके यांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे..

मी, रामदास भोसले, श्रीकांत पठारे, अनिल शेटे आणि प्रियंका खिलारी असे आम्ही पाच जणांनी एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे. आम्ही घेतलेल्या या निर्णयाच्या अनुषंगाने तालुक्यातल्या आम जनतेने विचारपूर्वक ज्याला लोकसभेच्या कामकाजाचा पाच वर्षांचा अनुभव आहे आणि अधिकची पाच वर्षे जर त्यांना मिळाली तर आणखीन एक अनुभव समृद्ध खासदार या भागाला मिळू शकेल असं आमचं मत आहे. म्हणून मी पंधरा वर्षे आमदार असताना ज्या कार्यकर्त्यांनी मला प्रेम दिल. पाच वर्षांपूर्वी झालेल्या पराभवानंतरही आजपर्यंत ही माणसं माझ्याशी प्रामाणिक राहिली त्या सर्वांना माझे आवाहन आहे की सुजय विखे पाटलांचा सक्रिय प्रचार करा. तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर मला कधीही फोनवर संपर्क करा असे आवाहन माजी आमदार विजय औटी यांनी केले असल्याचे समजते.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882

Advrt 



टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.