नगरमधे मराठा आरक्षण शांतता रॅलीची जय्यत तयारी.

नगर (प्रतिनिधी):-  

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात १२ ऑगस्ट रोजी नगर येथे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली होणार आहे.

महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगरची  ओळख आहे. अहमदनगर हा मराठा बहुल आहे.लाखो मराठे स्थायिक आहेत. नगरच्या रॅलीचे उत्कृष्ट नियोजन झाले असून दहा लाखाहून अधिक मराठे रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार नगरच्या रॅलीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे असणार आहेत:-

- शहरात सर्वत्र भगवे झेंडे, स्वागत कमानी व कटआउट्स , फटाकड्यांची आतिषबाजी 

- २५०० प्रशिक्षित स्वयंसेवक 

-  पोलिसांचा तगडा बंदोबस्त 

- पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था 

-  ध्वनिक्षेपक

-  LED स्क्रीनस्  

- १० ॲम्बुलन्स व वैद्यकीय पदके



*रॅलीचा मार्ग*

केडगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून... पुढे लगेचच छत्रपती  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केडगावमध्ये अभिवादन करण्यात येईल. अर्चना हॉटेल चौकात पाटलांचे भव्य स्वागत होईल.

कायनेटिक चौक येथून दुपारी १.००वाजता रॅलीला सुरुवात होईल.

त्यानंतर सक्कर चौकातून पुढे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पारंपरिक मिरवणूक मार्गाने चौपाटी कारंजा येथे रॅलीचे सांगता होईल. जरांगे पाटील नाशिकच्या दिशेने मार्गस्थ होताना सावेडी ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजित व पुष्पवृष्टी करत निरोप दिला जाईल.



*पार्किंग व्यवस्था*

१. न्यू आर्टस् कॉलेज मैदान

२. क्लेराब्रूस हायस्कूल मैदान

३. फटाकडा मार्केट मैदान, कल्याण रोड 

४. मार्केट यार्ड 

५. मार्केट यार्ड  समोरील फटाकडा मार्केट मैदान 

६. नेमाने इस्टेट, केडगाव 

७. गाडगीळ पटांगण 

इत्यादी ठिकाणे पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते.

तसेच ज्याना शक्य असेल त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा.

* आयोजकांकडून मराठा बांधवांना  सूचना:-*

- वाहने वरील पार्किंगमध्ये लावून शिवतीर्थावरून  चालत रॅलीमध्ये सहभागी व्हावे.

- पावसाळ्याचे दिवस असल्याने छत्री/रेकनॉट घेऊन येणे

- लहान मुलांच्या खिशात नाव, पत्ता व संपर्क क्रमांकाची चिठ्ठी ठेवणे

- अफवांवर विश्वास ठेवू नये

- पोलीस व मराठा सेवकांच्या सूचनांचे पालन करावे


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !