पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचा स्नेहबंधतर्फे गौरव. अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र व रोप देऊन केला सत्कार.

इमेज
अहिल्यानगर (हेमंत साठे):- गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचा स्नेहबंधच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी गौरव केला. राष्ट्रपती पदक स्वीकारल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे हे नुकतेच नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. या निमित्त त्यांचा डॉ. उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र व तुळशीचे रोप देऊन गौरव केला. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपस्थित होते. डॉ. शिंदे म्हणाले, विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी सांगलीत महापालिका शाळेतून प्राथमिक शिक्षण घेऊन  साताऱ्यातील सैनिक स्कूलमधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी रसायनशास्त्रात बीएस्सी पदवी मिळवली. चंद्रपूरमधील नक्षलग्रस्त भागातून त्यांनी पोलीस उपअधीक्षक म्हणून कर्तव्य बजावले, तसेच युनोमध्ये युगोस्लाव्हिया, कोसोवा येथे आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी म्हणून काम केले. ते मुंबईमध्ये सहा वर्षे पोलीस उपायुक्त होते. तसेच नाशिक शहर, कल्याण, ठाणे, धाराशिव या ठिकाणी त्यांनी पोलीस उपायुक्त तसेच पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली....

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.

इमेज
अहिल्यानगर (हेमंत साठे):- जिल्ह्यातील नगर तालुक्यात पिंपळगाव कवडा नावाचे एक छोटेसे गाव आहे. आज  जरी नगर तालुक्यात असला तरी पूर्वी हा गाव पारनेर परगण्यात होता.या  गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लागला आहे. गावात ठिक ठिकाणी ऐतिहासिक खुणा नजरेस पडतात.  याच गावच्या प्रवेश द्वारावर म्हणजे वेशीवर एक शिलालेख कोरलेला आहे. वेशीला रंग दिलेला असला तरी शिलालेख वाचता येतो. त्याचे वाचन कामरगावचे इतिहास अभ्यासक श्री सतीश भीमराव सोनवणे यांनी केले. ते असे १.|| शके १७०६ क्रोधी नाम संवछरे|| २.||माघ वद्य त्रयोदसी ते दीवसे भ|| ३.|| बहेरो अनंत जागीरदार जोसी कुळ ४.|| कर्णी मौ पिपळगाव कवडा पा| पार ५.|| नेर लागवाड रुपय १००१ शिलालेखाचा अर्थ-  शालिवाहन शकाच्या १७०६ व्या वर्षी क्रोधी नावाच्या संवत्सरात माघ वद्य त्रयोदशीला बहिरो अनंत जहागिरदार यांनी मौजे पिंपळ गाव कवडा परगणे पारनेर येथे  १००१ रुपये खर्च करून वेशीचे बांधकाम केले. मिती - शके १७०६, माघ वद्य त्रयोदशी, वार सोमवार, पिले जंत्री नुसार इंग्रजी तारीख - ०७ फेब्रुवारी १७८५ शिलालेखाची लिपी - खोदीव स्वरुपाचा हा शिलालेख बाळबोध देवनागरी लिपीत आ...

नगर तालुक्यात हॉटेलवर चालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पोलीस टीमची धडक कारवाई !

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- मिळालेल्या माहितीनुसार दि.23/02/2025 रोजी 5 वा चे सुमारास नगर सोलापुर रोड वाकोडी फाटा येथील साई श्रध्दा हॉटेल मध्ये देह विक्रीचा व्यवसाय करुन घेत असल्याच्या संशयावरुन काही स्थानीक इसमांनी देह विक्री व्यवसाय चालविणा-या इसमास मारहाण केले बाबतची पोलीस ठाणेस माहीती मिळाल्याने सहा पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना कळविल्याने पोलीस निरीक्षक दराडे यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर व पोलीस पथक यांनी वाकोडी फाटा येथील हॉटेल साई श्रध्दा येथे जाऊन पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी मुख्य सुत्रधार शहानवाज वहाब आलम हुसेन राहणार तपोवन रोड अहिल्यानगर मुळ रा. गरगलीया ता. ठाकुरगंज जि. किसनगंज राज्य बिहार. यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने महिलांना देहविक्री व्यवसाय करीता आणुन हॉटेल च्या पहील्या मजल्यावर रुम मध्ये मुक्कामी ठेऊन त्याचेकडुन देहविक्रीचा व्यवसाय करुन घेऊन त्यातुन मिळणा-या पैशातुन स्वतःची उपजिवीका करीत असल्याने हॉटेल साई श्रध्दा मधील दोन पिडीत महीला व एक अल्पवयीन मुलीची सुटका ...

शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोटींची फसवणूक करणारे सायबर भामटे गजाआड ! अहिल्यानगर सायबर पोलीसांनी आंतरराष्ट्रीय सायबर टोळीतील आरोपींना ठोकल्या बेड्या.

इमेज
अहिल्यानगर : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात १ कोटी १० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, भारतातील स्थानिक आरोपी परदेशातील गुन्हेगारांच्या मदतीने नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. फसवणुकीची व्याप्ती आणि पोलिसांचा तपास. २७ जानेवारी २०२५ रोजी फिर्यादीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती की, ऑक्टोबर २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत SMC Global Securities नावाने व्हॉट्सअॅपवरून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून २०-३० टक्के अधिक नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. या भूलथापांना बळी पडून फिर्यादीने १ कोटी १० लाख ८० हजार रुपये गुंतवले, मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण केले. यातून मिळालेल्या बँक खात्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी महावीर कांबळे (रा. गोटेवाडी, मोहोळ, सोलापूर) याला अटक केली. त्याच्या चौकशीतून आणखी तीन सा...

शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारा जेरबंद.

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शेअर मार्केटच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालणा-या आरोपीला काही तासातच चारचाकी वाहनाचा पाठलाग करुन जेरबंद करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी संभाजी भिमराज गाडेकर वय - 32 वर्षे, धंदा- हाँटेल व्यवसाय रा. माळेगाव ने ता.शेवगाव जि.अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी ए के नावाचे शेअर मार्केट ट्रेडींग नावाचे आँफीस रावतळे कुरुडगाव ता.शेवगाव जि. अहिल्यानगर येथे कंपनीच्या नावाखाली एकुण- 25 लाख 64 हजार रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- 95/2025 भादवि कलम -420,409,406,34 प्रमाणे दिनांक-03/02/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.   पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की,  नमुद गुन्ह्यातील आरोपी शिवाजी रावसाहेब बोरकर रा. थेरगाव ता.पैठण जि. छत्रपती संभाजीनगर हा थेरगाव येथे असल्याची बातमी मिळाल्याने तपासाची चक्रे वे...

फॉलोअर