नगर तालुक्यात हॉटेलवर चालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पोलीस टीमची धडक कारवाई !

अहिल्यानगर (प्रतिनिधी):- मिळालेल्या माहितीनुसार दि.23/02/2025 रोजी 5 वा चे सुमारास नगर सोलापुर रोड वाकोडी फाटा येथील साई श्रध्दा हॉटेल मध्ये देह विक्रीचा व्यवसाय करुन घेत असल्याच्या संशयावरुन काही स्थानीक इसमांनी देह विक्री व्यवसाय चालविणा-या इसमास मारहाण केले बाबतची पोलीस ठाणेस माहीती मिळाल्याने सहा पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना कळविल्याने पोलीस निरीक्षक दराडे यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर व पोलीस पथक यांनी वाकोडी फाटा येथील हॉटेल साई श्रध्दा येथे जाऊन पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी मुख्य सुत्रधार शहानवाज वहाब आलम हुसेन राहणार तपोवन रोड अहिल्यानगर मुळ रा. गरगलीया ता. ठाकुरगंज जि. किसनगंज राज्य बिहार. यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने महिलांना देहविक्री व्यवसाय करीता आणुन हॉटेल च्या पहील्या मजल्यावर रुम मध्ये मुक्कामी ठेऊन त्याचेकडुन देहविक्रीचा व्यवसाय करुन घेऊन त्यातुन मिळणा-या पैशातुन स्वतःची उपजिवीका करीत असल्याने हॉटेल साई श्रध्दा मधील दोन पिडीत महीला व एक अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे व आरोपी विरुद्ध भिंगार कॅम्प पोस्टे ला भारतीय न्यायसंहीता 96 सहा पोक्सो 4,8,12, स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतीबंधक कायदा 1956 चे कलम 3,4,5,6 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उप. विभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अहिल्यानगर अमोल भारती सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहा.पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, सफौ अकोलकर, पोहेकॉ पालवे,संदीप घोडके,रामनाथ डोळे, शिंदे, टकले, पोना शाहीद शेख, पोकॉ प्रमोद लहारे, मपोकों कांबळे यांनी केली.
खालील लिंक द्वारे आपल्या YouTube न्यूज चॅनलला SUBSCRIBE करा...
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=EgRQu2dcnJtdMx1P
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा