शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारा जेरबंद.
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शेअर मार्केटच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालणा-या आरोपीला काही तासातच चारचाकी वाहनाचा पाठलाग करुन जेरबंद करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी संभाजी भिमराज गाडेकर वय - 32 वर्षे, धंदा- हाँटेल व्यवसाय रा. माळेगाव ने ता.शेवगाव जि.अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी ए के नावाचे शेअर मार्केट ट्रेडींग नावाचे आँफीस रावतळे कुरुडगाव ता.शेवगाव जि. अहिल्यानगर येथे कंपनीच्या नावाखाली एकुण- 25 लाख 64 हजार रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- 95/2025 भादवि कलम -420,409,406,34 प्रमाणे दिनांक-03/02/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी शिवाजी रावसाहेब बोरकर रा. थेरगाव ता.पैठण जि. छत्रपती संभाजीनगर हा थेरगाव येथे असल्याची बातमी मिळाल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरवुन पोलीस पथक तयार करुन ता. पैठण येथे आरोपीना ताब्यात घेण्यासाठी पाठविण्यात आले होते. सदर आरोपीवर गुन्हा दाखल होताच दिनांक- 04/02/2025 रोजी मध्यरात्री 02/00 वाचे सुमारास तो पळुन जाण्याच्या तयारीत असतांना पाचोड जि. छत्रपती संभाजीनगर रोडने चारचाकी वाहनाचा पाठलाग करुन त्यानंतर गाडी थांबवुन पळुन जात असतांना तेव्हा पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास उसाचे शेतातुन ताब्यात घेवुन त्यास शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
वरिल आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे. तसेच सदर गुन्ह्यातील इतर दोन आरोपींचा लवकरात लवकर शोध घेवुन गुन्ह्यात अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक राकेश ओला , अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अहिल्यानगर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. समाधान नागरे, सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोहेकॉ/ चंद्रकांत कुसारे, पोना आदिनाथ वामन, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ संतोष वाघ, पोकाँ राहुल खेडकर, पोकाँ प्रशांत आंधळे, पोकाँ संपत खेडकर तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुड्डु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा