सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणेंचा कौतुकास्पद उपक्रम. कामरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.

 

नगर (प्रतिनिधी):- तालुक्यातील मौजे कामरगाव येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांनी शालेय विदयार्थ्याना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी याकरिता शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम राबविला.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, कामरगाव येथील बालवाडी मधे 11 वर्ष व अंगणवाडीमधे 22 वर्ष सेवा केल्यानंतर सेवानिवृत्ती घेतलेल्या सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तसेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्याना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी. याकरिता दि 14 ऑगष्ट रोजी विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केले.


       मिळालेल्या माहितीनुसार, त्या मागील 4 वर्षांपासून कै.रामचंद्र सोनवणे व मालनबाई सोनवणे या त्यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम कुठलाही गाजावाजा न करता तसेच कुठलाही प्रसिद्धी सोस न बाळगता  यशस्वीपणे राबवत आहेत. 


         कामरगाव जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी पुष्पाताई सोनवणे यांच्या हस्ते  शैक्षणिक साहित्य व खाऊचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी शाळेसाठी ज्येष्ठ नागरीक मालनताई आंधळे यांनी देखील वाटप व लोकसहभाग दिला. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका नंदा देवकर, शिक्षिका लक्ष्मी गायकवाड, अंगणवाडी सेविका मदतनीस यांची उपस्थिती होती. तसेच पारनेर युवा सेना तालुका अध्यक्ष तथा त्यांचे पुतणे शिवा सोनवणे, बबीता आंधळे, सेवानिवृत्त शिक्षक साठे सर, आरोग्य कर्मचारी प्रतिभा मैड, सिव्हिल इंजिनिअर संदिप लाळगे यांच्यासह ग्रामस्थ महिलांची उपस्थिती होती. अंगणवाडीतून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर देखील मुलांच्या शिक्षणाविषयी जागरुकता व आस्था दाखवत विदयार्थ्यासाठी उपक्रम राबवत असलेल्या पुष्पाताई सोनवणे यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.