गाडकवाडी, कुरणवस्ती, ठाकरवाडी जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
राहुरी (प्रतिनिधी):-
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र चे *संस्थापक निलेशजी सांबारे* यांच्या संकल्पनेतून दि. 3/09/2025 बुधवार रोजी देवळाली प्रवरा येथील *श्री. दिपकभाऊ त्रिभुवन* यांच्या वाढदिवसानिमित्त गाडकवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते पोपटजी गागरे यांच्या प्रयत्नांतून *गाडकवाडी* शाळेत गाडकवाडी, कुरणवस्ती व ठाकरवाडी या तिन्ही शाळेतील विदयार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संतकवी महिपती महाराज देवस्थान चे विश्वस्त ह. भ. प. बाबासाहेब वाळूंज,साई दिपक ञिभुवन,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गंगाधर हारदे, जि प प्रा शा गाडकवाडी च्या मुख्याध्यापिका सौ.लता गायकवाड ,कुरणवस्ती शाळेचे मुख्याधापक प्रमोद झावरे, सहशिक्षक उदय पाचपुते, लाजरस शिंदे, अरुण राहिंज आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी संतकवी महिपती महाराज देवस्थानचे विश्वस्त ह . भ. प . बाबासाहेब वाळुंज यांनी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे महाराष्ट्रातील सामाजिक कामाचा परिचय करून दिला. तसेच राहुरी तालुक्यात सुमारे ५ लाख वह्या वाटप करणार असल्याचे सांगितले. कार्यकमाचे सुत्रसंचालन उदय पाचपुते यांनी केले, तर आभार प्रमोद झावरे यांनी मानले .
गाडकवाडी, कुरणवस्ती व ठाकरवाडी शाळेच्या वतीने श्री. निलेशजी सांबारे व दिपकभाऊ त्रिभुवन, ह .भ.प .बाबासाहेब वाळुंज,सामाजिक कार्यकर्ते पोपट गागरे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा