कामरगावच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ! सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांचा ग्रामस्थांकडून "लोकसन्मान".

अहिल्यानगर(प्रतिनिधी)- कामरगाव( ता.अहिल्यानगर ) येथील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई अनुदान मिळावे यासाठी प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांचा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच वसंतराव ठोकळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार,माहे सप्टेंबर 2025 मध्ये गावात अतिवृष्टी झाल्यामुळे 383.96 हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले होते.त्यात कांदा,सोयाबीन,उडीद, व फुल शेतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.बाधित झालेल्या क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करावेत अन्यथा अहिल्यानगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला होता.त्याची प्रशासनाने दखल घेऊन तहसीलदार संजय शिंदे यांच्या आदेशावरून ग्राम महसूल अधिकारी संतोष मांडगे' कृषी सहाय्यक युवराज देवकर यांनी 537 शेतकऱ्यांच्या शेत बांधावर चिखल तुडवीत व पाऊस धारा झेलीत पंचनामे करून वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल दिला. होता.त्यानुसार 51 लाख 17 हजार 510 रुपये अनुदान मंजूर झाले तसेच याच काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धांत आंधळे यांनी नुकसान पाहणी जिल्हा दौऱ्यावर असलेले कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांना थांबवून निवेदन दिले होते.

 तसेच तुकाराम कातोरे यांनी सन 21- 22 ते 24- 25 या काळात झालेल्या अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई पंचनामे करून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता त्यानुसार त्या काळातील 60 लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळवून दिले होते.त्यामुळे गावाला मोठा दिलासा मिळाला आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी दिली.

       दूध संस्थेचे चेअरमन रविराज साठे व जगदीश शेळके यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या वतीने कातोरे यांचा ग्रामपंचायत कार्यालयासमोर मा.सरपंच वसंतराव ठोकळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी ग्रामपंचायतच्या वतीने कामरगावचे विद्यमान सरपंच संदीप ढवळे, वसंतराव ठोकळ, लक्ष्मण शामराव ठोकळ, शामराव आंधळे,संतोष आंधळे, राजेंद्र शिंदे,अशोक कातोरे, भाऊसाहेब महाराज ठोकळ, राजेंद्र पोटे, यांची भाषणे झाली 

या कार्यक्रमास प्रकाश कातोरे,बजरंग तालीम मंडळाचे अध्यक्ष श्रीराम कातोरे,बबन भुजबळ, संजय भुजबळ,दिलीप नानेकर,अंबादास रोहकले,पोपटराव साठे, मारुती आंधळे, संभाजी कातोरे,रामचंद्र कातोरे, सुखदेव महाराज साठे  मनोहर ठोकळ, संतोष साठे, संदिप पाडेकर,पठाण, संतोष दळवी, विलास झरेकर,अनिल कातोरे,करण कातोरे, संतोष कातोरे,गणेश आंधळे,बाबासाहेब भुजबळ, योगेश ठोकळ,विजय ढवळे,सोपान शिंदे,अंकुश खोडदे,प्रदीप साठे,बबनराव सांगळे, आसिफ शेख, योगेश ठोकळ,मिथुन गुंजाळ, प्रणव गुंजाळ,नंदू झरेकर, संतोष साठे,राजू पठाण,बाळू साठे, कैलास कातोरे, छगन कातोरे,यांचे सह मोठया संख्येने ग्रामस्थ, शेतकरी  मान्यवर उपस्थित होते

..............................................

 नोटांचा हार रुग्णाच्या मदतीसाठी.

 कार्यक्रमात माजी सैनिक राजेंद्र शिंदे यांनी तुकाराम कातोरे यांना दोन हजार रुपयांचा नोटांचा हार घातला. त्यात तुकाराम कातोरे यांनी स्वतःचे तीन हजार रुपये टाकून अहिल्यानगर येथील दवाखान्यात उपचार घेत असलेल्या गावातील गरीब कुटुंबातील महिला रुग्णासाठी पाच हजार रुपयाची मदत जाहीर केली.

.............................................................

 गावात गेल्या पाच वर्षात वारंवार झालेल्या अतिवृष्टी ग्रस्त 1000 शेतकऱ्यांना तुकाराम कातोरे यांनी एक कोटी हून अधिक  रुपये मिळवून दिले आहे त्यामुळे त्यांचा गावाला अभिमान व गावाचा त्यांना आधार आहे.

 वसंतराव ठोकळ माजी सरपंच कामरगाव.

.............................................................

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.