श्री नृसिंह विद्यालय, चास - माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा.

 

अहिल्यानगर(प्रतिनिधी) :- तालुक्यातील चास येथील श्री नृसिंह वि‌द्यालयातील सन १९९९ -२००० च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन सोहळा शुक्रवार, दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी विद्यालयात उत्साहात संपन्न झाला. तब्बल २५ वर्षांनी विद्यार्थी पुन्हा शाळेच्या परिसरात एकत्र जमले आणि जुन्या आठवणींनी शाळेचा प्रांगण भरून गेले.

कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ शिक्षक व विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. गणपत अंबुले सर यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर वि‌द्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्री. रंगनाथ सुंबे सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमास सुरुवात झाली.

यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यार्थ्यांकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि रौप्य महोत्सवी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने आपला परिचय दिला आणि शालेय जीवनातील खोड्या, शिक्षा आणि त्या आठवणींना उजाळा दिला.

विद्यार्थ्यांनी भावनिकपणे व्यक्त केले की 

"शाळेतील प्रत्येक वास्तू, प्रत्येक भिंत आमच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देत आहे. आमची शाळा कुठेही नाही, ती आमच्या मनातच आहे."

विद्यार्थिनर्नीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते, कारण त्यांनी मान्य केले की त्यांच्या जीवनातील घडणीत शिक्षकांनी मार्गदर्शक, पालक आणि प्रेरणादायी वाटाड्या म्हणून भूमिका बजावली.

मा. मुख्याध्यापक श्री. अंबुले सर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, "तुम्ही आज विविध क्षेत्रात कार्यरत आहात, मात्र व्यसन, भ्रष्टाचार यापासून दूर राहून समाजाच्या विकासात हातभार लावा. आपली पुढील पिढी योग्य मार्गावर राहील यासाठी पालक म्हणून सजग राहा." शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुंबे सर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात विद्यार्थ्यांना उ‌द्देशून सांगितले की, "जसे दीपस्तंभ (लाइटहाऊस) भरकटलेल्या जहाजाला दिशा दाखवते, तसेच तुम्ही समाजातील इतरांना योग्य मार्ग दाखवणारे बना." त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे यशस्वी कारकिर्दीसाठी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी तत्कालीन शिक्षक श्री. सुनिल अकोलकर सर, श्री. चंद्रकांत भवर सर, श्री. बाबासाहेब घुंगार्डे सर, श्रीमती. संगीता काटे मॅडम, श्रीमती. कमल निमसे मॅडम आणि श्रीमती. अकोलकर मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर रुचकर भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. स्नेहसंमेलनात सुजीत भोंग, सचिन शिर्के, कमलेश गाडेकर, मारुती देवकर, स्वाती गावखरे, सुनिता गायकवाड, रोहिणी देवकर, दत्ता इथापे, महेश कार्ले, विक्रांत कुटे, वैशाली रासकर आणि विलास आंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शिर्के यांनी केले, तर अरुण गोंडाळ यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यालयाचे आजचे आणि माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******************************************

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.