वृक्ष ध्वनी प्रदूषणाला नियंत्रित करण्याचे कामही करतात : उप वनसंरक्षक सुवर्णा माने ;स्नेहबंध तर्फे बालिकाश्रम विद्यालय येथे वृक्षारोपण.
नगर (प्रतिनिधी) - वृक्ष माणसांत आनंद आणि उत्साहाची भावना निर्माण करतात. ध्वनी प्रदूषणाला नियंत्रित करण्याचे काम देखील झाडे करतात, असे प्रतिपादन उप-वनसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले. स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने माणिकताई करंदीकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बालिकाश्रम येथे वृक्षारोपण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, शाळेच्या अध्यक्षा डॉ. गीता करंदीकर, सदस्या डॉ. दिप्ती करंदीकर, मुख्याध्यापक अनिल सुद्रिक, मुख्याध्यापिका जाहेदा पठाण, निवेदिका प्रा. शर्मिला कुलकर्णी, प्रा. किशोर अहिरे, सुहेल शेख आदी उपस्थित होते. उप वनसंरक्षक माने म्हणाल्या, झाडांकडे पाहण्यामुळे मनाला शांतता मिळते, मनावरचा तणाव कमी होतो. ज्या शाळेच्या परिसरात अधिक झाडे लावलेली असतात, तेथील विद्यार्थी खेळकर स्वभावाचे असतात, असे आता विज्ञानाने सप्रमाण सिद्ध केले आहे. वृक्ष आहेत डॉक्टरही.... २ कोटी वृक्ष लावल्यास २६ कोटी टन जास्त ऑक्सिजन मिळू शकतो. त्याचबरोबर हे दोन कोटी वृक्ष वातावरणातला एक कोटी टन इतक्या मोठ्या प्रमाणावरील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. त्यामुळे