घोसपुरी गावच्या आजी माजी सैनिक संघटनेच्या प्रयत्नातून भव्य कमान साकार.

 


नगर ( प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील घोसपुरी येथील आजी-माजी सैनिक संघटनेच्या विशेष प्रयत्नातून साकार झालेल्या भव्य कमानीचे उदघाटन पद्मश्री पोपटराव पवार आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

       याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगर तालुक्यातील घोसपुरी गावामधे  आजी माजी संघटनेच्या विशेष प्रयत्नातून भव्य अशी कमान साकारण्यात आली. यावेळी घोसपुरी गावामधे शेकडो जनसमुदायाच्या उपस्थितीत मोठया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी  कारगिल योद्धा नायक दीपचंद्र पंचग्रामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत होते. तर पद्मश्री पोपटराव पवार व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते कमानीचे उदघाटन करण्यात आले. घोसपुरी येथील आजी माजी सैनिकांच्या विशेष प्रयत्नामधून घोसपुरी गावचे विशेष आकर्षण ठरणारी भव्य कमान साकारण्यात आली. सीमेवर देशाचे रक्षण करणारे जवान समाजाप्रती व गावाप्रती देखील आपले सामाजिक दायित्व तितक्याच कर्तव्य तत्परतेने निभावतात. हे घोसपुरी गावच्या आजी माजी सैनिकांनी दाखवून देत समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. तसेच जय जवान जय किसान हे ब्रीद वाक्य कोरलेली कमान ही जवानांच्या देशप्रेमाच प्रतीक ठरली आहे. घोसपुरी गावातील आजी माजी सैनिकांच्या या कार्याच घोसपुरी गावासोबतच पंचक्रोशिसह सर्वत्र कौतुक होत आहे.

       या कार्यक्रम प्रसंगी आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच घोसपुरी गावातील ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !