एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीतील या आरोपीवर हद्दपारीची कारवाई !
अहमदनगर:- एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीतील आरोपी नामे अंतोन शामसुंदर गायकवाड, रा. कातोरे वस्ती, नागापुर ता. जि. अहमदनगर यास दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्हयाचे स्थळसिमेचे हददीतुन दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आरोपी नामे अंतोन शामसुंदर गायकवाड, रा. कातोरे वस्ती, नागापुर ता. जि. अहमदनगर याचेविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे. १) एमआयडीसी पोस्टे गुरनं. १४७/२०१६ भादंवि कलम ३२६, ३५४,३२३, ५०४, ५०६ प्रमाणे (न्यायप्रविष्ठ) २) एमआयडीसी पोस्टे गुरनं २६४ / २०१६ भादंवि कलम ३२५, ३२४, ३८५, २०१, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे (न्यायप्रविष्ट)
३) एमआयडीसी पोस्टे गुरनं. १४९/२०१६ भादंवि कलम ३०९ प्रमाणे (न्यायप्रविष्ट) ४) एमआयडीसी पोस्टे गुरनं. ५२९/२०१६ भादंवि कलम ३९४ ३४ प्रमाणे (न्यायप्रविष्ट)
५) एमआयडीसी पोस्टे गुरनं. १४२/२०१७ भादंवि कलम ३८४, ५०४, ५०६ प्रमाणे (
न्यायप्रविष्ट ६) एमआयडीसी पोस्टे गुरनं. १२५/२०२२ भादंवि कलम ३०६, ३०२३, ३४ प्रमाणे (न्यायप्रविष्ट) ७) एमआयडीसी पोस्टे गुरनं. ६७३ / २०२१ भादंवि कलम ३२४ प्रमाणे (न्यायप्रविष्ट)
८) एमआयडीसी पोस्टे पनाको नंबर ८४२ / २०२२ भादंवि कलम १८६ प्रमाणे
नमुद आरोपी याचेविरुध्द वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याने मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे प्रस्ताव मा. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्फतीने मा. उपविभागीय दंडाधिकारी सो नगर भाग अहमदनगर यांना आरोपी अंतोन शामसुंदर गायकवाड यास दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्हा स्थळ हददीतुन हृददपार करणेबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याप्रमाणे मा. उपविभागीय अधिकारी नगर भाग अहमदनगर यांचेकडील हददपार प्रस्ताव क्र.०४/२०२३ दि. १३/०४/२०२३ अन्वये आरोपी अंतोन शामसुंदर गायकवाड यास अहमदनगर जिल्हयाचे स्थळसिमेचे हददीतुन दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्री. राकेश ओला. पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे . अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री. अजित पाटील . उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. राजेंद्र सानप . प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोस्टे, पोसई श्री. पाठक सो, पोहेकॉ नितीन उगलमुगले, पोना मच्छिंद्र पांढरकर, पोना राहुल शिंदे, पोशि सुरज देशमुख, पोकों सचिन हरदास यांचे पथकाने केलेली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा