भिंगार पोलिसाची बिंगो जुगार अड्ड्यावर कारवाई
अहमदनगर:- भिंगार पोलिसा कडून बिंगो जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई मधे भिंगार शहरातील शुक्रवार बाजार येथे केलेल्या कारवाईत ११२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भिंगार पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे हे मुकुंदनगर या भागामध्ये पाहिजे असलेले आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमी मिळाली की भिंगार शहरातील शुक्रवार बाजार येथे नेहरू मार्केटच्या पाठीमागे बि,गो जुगार काही व्यक्ती पैसे लावून खेळवीत आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी तात्काळ पथक तयार केले त्यामध्ये सहाय्यक फौजदार वराट पोलीस अमलदार अजय नगरे, अमोल आव्हाड,राहुल द्वारके, सागर तावरे कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून दुपारी 2 वाजेच्या सुमारास शासकीय गाडीने पथक गोपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे भिंगार शहरातील शुक्रवार बाजार येथील नेहरू मार्केटच्या मागे सुरू असलेल्या बेगोजोगरावर धाड टाकली यावेळी विनोदसिंग कैलाससिंग परदेशी वय 38 राहणार एमजी रोड भिंगार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपीकडून भिंगार पोलिसांनी यावेळी 11270 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये मिळाला माल 1)8000/- रुपये कि चा एक काळे रंगाचा SAMSUNG कंपनीची 32 इंची स्क्रीन जुवा कि अं.2)3270/- रू रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा 1 असा एकून 11,270/- मुद्देमाल भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला
सदर कारवाईची फिर्याद भिंगार पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सागर भास्कर तावरे यांनी आरोपी विनोदसिंग कैलासिंग परदेशी यांच्या विरोधात विरोधात 11गुरनं 217/2022 महा जुगार क्र.12 (अ)प्रमाने फिर्याद दाखल केली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहराचे पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व प्रभारी दिनकर मुंडे,सहाय्यक फौजदार वराट पोलीस अमलदार अजय नगरे,अमोल आव्हाड,राहुल द्वारके, सागर तावरे या पथकाने कारवाई केली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा