भाजप कार्यकर्त्यांनी सेतूचे काम करावे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
अहमदनगर (प्रतिनिधी) संपूर्ण जगाने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैश्विक नेते मानले असून आता आपल्यावर ही जवाबदारी आहे की या आपल्या नेत्यांनी गरीब कल्याणसाठी किती मोठे काम मागील 9 वर्षात केले आहे. आणि या करिता तुम्हाला सेतु होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते अहमदनगर येथे आयोजित भाजप पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महसूल, पशू संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, मोनिकताई राजळे,राम शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्दीले, खा.डॉ.सुजय विखे पाटील जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,महेंद्र गंधे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की सध्या आलीबाबा आणि चाळीस चोर हे एकत्र येवून मोदीजी यांना विरोध करण्यासाठी आघाडी करत आहेत, परंतु त्यांना या गोष्टीच भान राहिले नाही की आता आपले पंतप्रधान हे विश्वाचे नेते झाले आहेत. त्यांना महासत्ता देश हे वाकून आदराने आपले बॉस म्हणत आहेत परंतु आपल्या देशातील काही कर्मदरिद्री लोक हे त्यांचे नेतृत्व मानत नाहीत. मोदीजीनी गरीब कल्याणसाठी मागील 9 वर्षात अनेक महत्वपूर्ण योजना आणल्या एवढचनाही तर या योजनासाठी मोठ्या प्रमाणावर निधि हा दिला त्यात मग शेतकरी, शेट मजूर, कामगार या सर्वांचा समावेश आहे , कोरोंना सारख्या महामारीत सबंध देशात मोफत लसीकरण केले. आता पायाभूत सुविधा देयण्यावर त्यांचा भर आहे. अशावेळी आपण भाजपचे सेतु होहून आपल्या नेत्यांनी गरीब कल्याण तसेच सर्वसामान्यासाठी जे जे दिले त्या बद्दल घरोघरी जावून सांगण्याची वेळ आली आहे. आपण हे काम जेवढ्या जवाबदारीने पूर्ण कराल तेवढी पुढची पिढी ही आपल्या पक्षासाठी तयार होईलअसे त्यांनी सांगून विरोधक हे एकत्रित येण्यासाठी धडपड करत आहेत मात्र त्यांचा नेता कोण हेच अजून ठरत नाही त्यामुळे त्यांची काळजी आपण करायची नाही आपण आपल्या माणसासाठी धडपड करून तो कोणत्याही योजने पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावयाची आहे असे संगितले. राज्यात ही आता आपले सरकार आले आहे त्यामुळे आता विकासाची गती ही खूप वाढलेली आहे. पूर्वीचे सरकार हे घरातून काम करत होते आणि ते फक्त स्वतःच्या परिवारसाठी काम करत होते असा टोला लगावताना फडणवीस यांनी मागचे भ्रष्टाचारी सरकार आता गेले असून जनहितचा विचार करणारे आपले सरकार आहे असे संगितले. त्यामुळे मागील अर्थसंकल्पात आपण जे जे लोककल्याणकारी निर्णय घेतले त्या बद्दल जनतेला समजून सांगण्याची जवाबदारी ही तुमच्यावर असून ही जवाबदारी आपण व्यवस्थित पार पाडालं असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी देव,देश,धर्मासाठी स्वराज्याची स्थापना केली आपणासही त्याच करिता येणार्या काळात भाजपचे सरकार आणावायचे आहे आणि आपण सर्वांनी त्या करिता कामाला लागलं पाहिजे असे आवाहन केले. पक्षातील छोटे छोटे मतभेद या कडे आपण लक्ष न देता आपण सर्व एकच आहोत या भावनेने काम करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगताना, गावपातळीवर पक्षाचे काम मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज असल्याच्या सूचना यावेळी केल्या.
विकासाच्या मार्गावर आपले सरकार हे जात असून त्यामुळेच समृद्धि सारखे महामार्ग हे बनत आहे जे की काळाची गरज आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युतीचे 42 खासदार येणार्या लोकसभा निवडणुकीत आपल्या सर्वांना निवडून आणावायचे असून पक्षासाठी एक वर्षाचा कालावधी द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार हे गतिमान सरकार असून मागील सरकार सारखे फेसबुक सरकार हे नाही , त्यामुळे आपल्या सर्वांचे आणि सर्वसामान्यांसाठी दिवस रात्र काम करणारे हे सरकार आहे. राज्य शासन आणि केंद्र शासन हे आपल्या सर्वांसाठी अनेक योजना राबवित असून या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी आपण सर्वांनी सातत्याने काम केले पाहिजे. गाव पातळीवर अशा योजनांच्या बाबतीत जनजागरण करून सरकार आपल्या पाठीशी आहे असा विश्वास आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेला दिला पाहिजे. या करिता गाव पातळीवरील आपली यंत्रणा ही आता कामाला लागली पाहिजे, तरच आपल्या सरकारने केलेल्या कामाची पावती आपल्याला मिळेल. या बरोबरच बूथ सक्षमीकरण, वार्ड निहाय संपर्क या अशा बाबी देखील आपण सर्वांनी येथून पुढे पाहणे गरजेचे आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून येथून पुढे आपण संपर्क दौरा काढणार असून या दौर्यात सर्वसामान्यांना भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून त्या अडचणी लगेचच सोडविल्या जातील असे संगितले.
या मेळाव्यात आमदार राम शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार सुजय विखे पाटील यांनी विजयी कलश देवून त्यांचा सत्कार केला.
या प्रसंगी आ बबनदादा पाचपुते, आ प्रा राम शिंदे , आ मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, सौ आश्र्विनी थोरात, अक्षय कर्डिले, तसेच बूथ प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते , सर्व फ्रंटलचे प्रमुख उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा