वृद्धांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन कोल्हार गावचा नवा आदर्श:- शिवाजी पालवे.



पाथर्डी ( प्रतिनिधी):-तालुक्यातील सुंदर माझे गाव कोल्हार तयाचे नाव तीर्थक्षेत्र कोल्हुबाई गड कोल्हार नावाने प्रसिद्ध असलेले आदर्श गाव कोल्हार येथे नुकतेच विठ्ठल रुक्मिणी चे नवीन मंदिर बांधकामासाठी भूमिपूजन सोहळा पार पडला गावातील वृद्ध व्यक्ती ज्या मराठमोळी संस्कृती जपत आजही फेटे बांधून आपली शेतीची कामे करतात अशा कष्टकरी शेतकरी बांधवांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले.


यावेळी गावचे भूषण असलेले कष्टकरी शेतकरी साळुबा पालवे भाऊ पालवे‌ विश्वनाथ डमाळे  ज्ञानदेव पालवे त्रिंबक पालवे परबत जाधव लक्ष्मण जाधव मोहन डमाळे  कांतीलाल जावळे देवराम जावळे  लक्ष्मण पालवे नामदेव पालवे  दामू जाधव किसन‌ गिते  किसन‌नाना पालवे  यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी गावचे सरपंच राजू नेटके उपसरपंच गोरक्ष पालवे ग्रामपंचायतचे सदस्य ईश्वर पालवे संदीप पालवे अभिजीत पालवे आप्पा गर्जे नवनाथ पालवे सोपान पालवे शरमा पालवे ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव पालवे गुरुजी सोपानरावजी पालवे शंकरराव डमाळे जय भगवान महासंघाचे मदन शेठ पालवे अँड पोपटराव पालवे अँड संदीपराव जावळे जय हिंद वृक्ष बँकेचे शिवाजीराव गर्जे  युवा नेते बाळासाहेब पालवे गौरव गर्जे किशोर पालवे अशोकराव गर्जे मा सरप़ंच बाबाजी पालवे भाऊसाहेब पालवे रोहिदास पालवे पोपट पालवे यादवराव पालवे साहेबराव पालवे चंदू नेटके नवनाथ पालवे ऋषी पालवे मनसजन पालवे  धनु गर्जे नामदेव जावळे गुरुजी नामदेव गीते टोपाजी पालवे राहुल पालवे‌ विजय पालवे बाळु जावळे अनिल पालवे कचरू पालवे राजेंद्र पालवे ग्रामसेवक शिवाजी पालवे आदी उपस्थित होते आपल्या गावच्या विकासासाठी व आपल्या परिवारासाठी ज्यांनी आपले आयुष्य या गावांमध्ये कष्टाने संस्कार संसार फुलवण्यात घातले असे आपल्या गावातील आपल्यासाठी आदर्श असलेली आपली वडीलधारी मंडळी यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन झाले असून हा एक  महाराष्ट्रा राज्याला आदर्श घालून देण्याचे काम आज आपल्या आदर्श कोल्हार गावा ने  केला आहे‌ असे  वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे त्यांच्यामुळे आज आपण आहोत त्यांच्या आदर्श मुळेच आज आपले जीवन उज्वल आहे असे प्रतिपादन शिवाजी पालवे यांनी केले यावेळी सर्व वृद्ध मान्यवरांचा सन्मान जय हिंद फौंडेशन अहमदनगर व ग्रामपंचायत कोल्हार च्या वतीने करण्यात आला आभार महादेव पालवे गुरुजी यांनी मानले.


📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.