रुईछत्तीसी ग्रामपंचायतकडे सार्वजनिक मुतारी नसल्याने नागरीकांची गैरसोय !
नगर (शिवा म्हस्के) : सार्वजनिक शौचालय हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक घटक आहे. केंद्र व राज्य सरकार १४वा वित्त आयोग व १५ वित्त आयोग निधी प्रत्यक्ष ग्रामपंचायत खात्यात वर्ग करत आहे. कारण त्या गावातील समस्या मुलभूत सुविधा सोडविण्यासाठी हा निधी प्रामुख्याने दिला जातो.शासन सार्वजानिक स्वच्छता गृह संकुलासाठी २ लाखा रूपये निधी दिला जातो.नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रुईछत्तीसी गाव एक मोठ्या नावारूपाला आलेली बाजार पेठ झाली आहे. या ठिकाणी लाखो रुपये उलाढाल होत आहे. या बाजार पेठेत विविध प्रकारचे व्यवसाय निर्माण झाले बेरोजगार तरुणांना व्यवसाय संधी उपलब्ध झाली.
परंतु त्या प्रमाणेच या ठिकाणी खरेदीदार ग्राहकांना येणाऱ्या नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास या ठिकाणी रुईछत्तीसी ग्रामपंचायत कुठे तरी कमी पडलेली दिसत आहे. या ठिकाणी दर रविवारी भाजीपाला आठवडे बाजार भरतो या ठिकाणी हजारो संख्येत ग्राहक खरेदी विक्री करण्यासाठी येत असतात पण या ठिकाणी महिला पुरुष वर्गासाठी पिण्याचे पाणी, कुठे सांधे सार्वजनिक स्वच्छतागृह अथवा मुतारी उपलब्ध नाही.कचरा साम्राज्य , गटार व्यवस्थापन नाही. अशा या ठिकाणी महिला वर्गाची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे.पंरतु लाखो रुपये उलाढाल असलेल्या ग्रामपंचायतचे याकडे लक्ष देण्यास वेळ नाही स्पष्ट दिसुन येते आहे. या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया,खत बियाणे कपडे दुकान, सेवा सोसायटी, सहकारी बँक, धान्य खरेदी विक्री आडत,महाविद्यालय, जुनियर काॅलेज, हजारो विद्यार्थी विद्यार्थिनीची संख्या आहे. महाविद्यालय सुट्टी झाल्यानंतर महाविद्यालय मुला मुलींना नगर सोलापूर रस्त्यावरील रुईछत्तीसी गावच्या बस स्थानक वर कुठल्याही प्रकारची सार्वजानिक स्वच्छता गृह अथवा मुतारी उपलब्ध नाही.या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नोकरवर्ग देखील आहे.या कर्मचारी प्राथमिक नैसर्गिक विधीची साठी झाडाझुडुपांचा आसरा घ्यावा लागत आहे.हि बाब अतिशय शरमेची आहे.
या ठिकाण आपल्या गावी जाण्यासाठी बस वाट पाहण्यासाठी उभा.असलेल्या मुली ,महिलांना, प्रवासी पुरुषाना कोणत्याही प्रकारची प्राथमिक नैसर्गिक विधीची सुविधा नाही. या गावात मोठं मोठ्या राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, पुढारी,कार्यकर्ते सामाजिक संघटना असुन देखील या मुलभूत सुविधा कडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते आहे. प्रवासी व महाविद्यालयीन विद्यार्थिनी, बाजारपेठ येणारे व्यापारी,ग्राहक महिलांची स्वच्छता गृह उभारणीची मागणी जोर धरू लागली आहे.
{मी पंचायत समितीच्या उपसभापती या पदावर असताना रुईछत्तीसी गावांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहास पाच लक्ष रुपये निधी मंजूर करून आणला सदर स्वच्छता गृह हे बसस्थानक परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने नाहरकत न दिल्याने सदर निधी ग्रामपंचायत कार्यालय कडे वर्ग करण्यात आला. तो निधी ग्रामपंचायतने विठ्ठल रखुमाई मंदिर देवस्थान परिसरात स्वच्छतागृह बांधण्यात आले.}
रविंद्र भापकर (माजी उपसभापती रुईछत्तीसी)
{ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यावर सार्वजनिक स्वच्छतागृह व मुतारी विषयी चौकशी करून माहिती कळवतो.}
विलास लोखंडे (सरपंच रुईछत्तीसी)
{रुईछत्तीसी गावात सार्वजनिक स्वच्छता गृह विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात व ग्रामपंचायत कार्यालयचे गाळे असलेल्या ठिकाणी एक मुतारी अशा दोन ठिकाणी सुविधा आहे.}
मोहन परभणे (ग्रामविकास अधिकारी रुईछत्तीसी)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा