लक्ष्मणराव ठोकळ मित्रपरिवाराच्या पाठपुराव्याला यश .; सदगुरु साधुबाबा सभामंडपासाठी भरीव निधीची मा.मंत्री शिवाजीराव कर्डिलेंची घोषणा !
नगर (प्रतिनिधी):- तालुक्यातील कामरगाव येथील सदगुरू साधुबाबा मंदिराच्या सभामंडपासाठी कामरगावचे विदयमान ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव ठोकळ व मित्रपरिवाराकडून मागील अनेक दिवसापासून मा मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले व नगर दक्षिण चे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश प्राप्त झाले असून मा.मंत्री कर्डिले यांनी सभामंडपासाठी दहा लाख रूपयाचा निधी देण्याची घोषणा केली आहे. असे संस्थेचे विश्वस्त राम नानेकर यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कामरगाव येथील सद्गुरु साधु बाबा मठाच्या सभामंडपासाठी विदयमान ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव ठोकळ व मित्रपरिवाराने मा.मंत्री. तथा जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
दि ५ सप्टेबर रोजी कामक्षा माता सप्ताह निमित्ताने मा.मंत्री.कर्डिले हे काम रगाव येथे आले होते. काल्याच्या किर्तनानंतर सदगुरु साधु बाबा मंदिर येथे कर्डिलेंनी भेट दिली. यावेळी लक्ष्मणराव ठोकळ मित्रपरिवाराच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत. मा.मंत्री शिवाजी कर्डिलेंनी दहा लाख रूपये सभामंडपासाठी देण्याची घोषणा केली. व श्री कर्डिले व ह.भ.प. सिनारे महाराज यांनी नारळ फोडला. अशी माहिती विश्वस्त राम महाराज नानेकर यांनी दिली.
या कार्यक्रम प्रसंगी विदयमान ग्रा.पं. सदस्य लक्ष्मण ठोकळ, संस्थेचे अध्यक्ष श्याम महाराज नानेकर, राम नानेकर, मा. मुख्याध्यापक सुदाम ठोकळ, मा.उपसरपंच अनिल आंधळे, उदयोजक मनोज ठोकळ, ग्रा.पं. सदस्य. गणेश. साठे, सरपंच तुकाराम कातोरे,मा.उपसरपंच संदिप लष्करे, सोसायटी चेअरमन सुनिल चौधरी, व्हा. चेअरमन राजू राजगुरु, संजय महापुरे, बाळू भुजबळ, गोरख मामा साठे, गुलाब कातोरे, अनिल कातोरे, सौ. सुनिता साठे, सौ. विजया भुजबळ , सौ. कल्पना महापुरे, विष्णू कातोरे, शिवाजी साठे, बबन बुरुकुले, रावसाहेब आंधळे, सुनिल आंधळे, प्रतिक साठे, अनमोल गंधे , सौरभ आभाणे हे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा