कामरगावच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ! सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांचा ग्रामस्थांकडून "लोकसन्मान".
अहिल्यानगर(प्रतिनिधी)- कामरगाव( ता.अहिल्यानगर ) येथील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई अनुदान मिळावे यासाठी प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांचा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच वसंतराव ठोकळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार,माहे सप्टेंबर 2025 मध्ये गावात अतिवृष्टी झाल्यामुळे 383.96 हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले होते.त्यात कांदा,सोयाबीन,उडीद, व फुल शेतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.बाधित झालेल्या क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करावेत अन्यथा अहिल्यानगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला होता.त्याची प्रशासनाने दखल घेऊन तहसीलदार संजय शिंदे यांच्या आदेशावरून ग्राम महसूल अधिकारी संतोष मांडगे' कृषी सहाय्यक युवराज देवकर यांनी 537 शेतकऱ्यांच्या शेत बांधावर चिखल तुडवीत व पाऊस धारा झेलीत पंचनामे करून वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल दिला. होता.त्यानुसार 51 लाख 17 हजार 510 रुपये अनुदान मंजूर झाले तसेच या...