श्री क्षेत्र दत्त देवस्थान कामरगाव येथे संगीतमय तुलसी रामायण सोहळा व नाथभक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन. ; आयोजक श्री.बापू माऊली ठोकळ यांचे नागरीकांना आवाहन.
अहिल्यानगर/ प्रतिनिधी:- तालुक्यातील कामरगाव येथे श्री. दत्त देवस्थान या ठिकाणी संगीतमय तुलसीरामायण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र कामरगाव येथे संगीतमय तुलसीरामायण कथा सोहळा मोठ्या भक्तीभावाने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती श्री दत्त देवस्थानचे मठाधिपती श्री.बापू माऊली ठोकळ यांनी दिली. दिनांक २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत हा भव्य अध्यात्मिक सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान दररोज विविध आध्यात्मिक विषयासह संगीतमय तुलसी रामायण कथाकथन तसेच रामभक्तीने परिपूर्ण धार्मिक उपक्रमांचे तसेच रोज भाविकांसाठी प्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि १ डिसेंबर २०२५ रोजी नाथभक्त तथा सुप्रसिद्ध नाथगायक आकाश शिंदे यांचा नाथ भक्ती गीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांसाठी आयोजक बापू माऊली ठोकळ व आयोजक मंडळाने सर्व नागरिकांना, भाविकांना व सांस्कृतिक रसिकांना उपस्थित राहून हा अध्यात्मिक सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
आयोजक श्री.बापू (माऊली) ठोकळ यांच्या वतीने सांगण्यात आले की, “रामकथा ही भक्ती, ज्ञान आणि संस्कारांचे प्रेरणास्थान आहे. नागरीकांनी संपूर्ण कुटुंबासह उपस्थित राहून या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घ्यावा.”
भक्तजनांनी वेळापत्रकानुसार उपस्थित राहून अध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रम स्थळ :-
श्री दत्त देवस्थान, श्री क्षेत्र कामरगाव, ता.अहिल्यानगर, जिल्हा.अहिल्यानगरनगर
*******************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा