सुप्यात वाहतूक कोंडीचा कहर ! अहिल्यानगर- पुणे महामार्गावर आपत्कालीन सेवांवर परिणाम.

 

अहिल्यानगर  (प्रतिनिधी): अहिल्यानगर–पुणे महामार्गावरील सुपा परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस भीषण रूप धारण करत आहे. सुपा गाव ते टोल नाका परिसरापर्यंत वाहतुकीची सततची कोंडी आता नागरिक, प्रवासी, उद्योगधंदे तसेच रुग्णवाहिकांसाठी मोठ्या संकटाचे रूप घेत आहे.

*प्रमुख कारणे : रस्त्यावर पार्किंग व अतिक्रमण.*

सुपा बाजारपेठ परिसरात प्रसिद्ध बेकरी पदार्थांसाठी वाहनांची मोठी गर्दी होत असून अनेक बेशिस्त वाहन चालक रस्त्यातच गाड्या उभ्या करतात. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही मिनिटांतच ठप्प होते.

मध्यंतरी अहिल्यानगर–पुणे महामार्गालगत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमण वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे.

*एमआयडीसी पोलिस स्टेशनकडे नागरिकांचा आक्षेप.*

सुपा एमआयडीसी पोलिसांनी या वाहतूक कोंडीवर ठोस भूमिका घेत नसल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे.महामार्गावर सतत वाढणाऱ्या वाहनसंख्येचा विचार करता येथील वाहतूक नियोजन अपुरे असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

आपत्कालीन सेवा धोक्यात

आज (दि. २७ मे) एका प्रवाशाने ११२ आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितल्यानंतरच वाहतूक काही प्रमाणात सुरळीत करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार—

▪️पुण्याकडे जाणारी एक रुग्णवाहिका तब्बल पाऊण तास कोंडीमध्ये अडकली.

तसेच खाजगी वाहनातून जाणारे रुग्ण देखील अडकले.

▪️विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांचे वेळापत्रक बिघडले.

▪️टोल नाक्यावर वाहतुकीची व्यवस्था कोलमडते.

▪️नागरिकांचे प्रशासनाला थेट प्रश्न

सुपा पोलिस ठोस कारवाई का करीत नाहीत?

▪️अतिक्रमण हटवूनही ते पुन्हा कसे वाढते?

▪️अवैध पार्किंग व वाहतूक समस्येत पोलिसांची मवाळ भूमिका का?

▪️रुग्णवाहिका व आपत्कालीन वाहने अडकण्याला जबाबदार कोण?

तत्काळ उपाययोजनांची मागणी

स्थानिक नागरिक, वाहतूकदार आणि सामाजिक संघटनांनी पुढील उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी केली आहे—

▪️रस्त्यातील अवैध पार्किंगवर कठोर कारवाई

▪️बेकरी/हॉटेल परिसरात स्वतंत्र पार्किंग व्यवस्था

▪️टोल नाक्यावर वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका.

▪️एमआयडीसी पोलिसांकडून कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण पथक

▪️अतिक्रमणावर सातत्याने कारवाई.

नगर–पुणे महामार्ग हा जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असून सुपा परिसरातील ही वाहतूक समस्या नित्याचीच झाली आहे.  वाहतुक कोंडीची तातडीने सोडवणे आवश्यक आहे, अन्यथा मोठे अपघात व जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.


“अहिल्यानगर–पुणे महामार्गावरील सुपा गावात रोजची वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. पोलीसांच्या वाहतुक नियोजनावर प्रवाशांकडून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रस्त्यावर अवैध पार्किंग, अतिक्रमण, पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे परिस्थिती गंभीर बनत आहे. तात्काळ उपाययोजना न केल्यास पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देणार आहोत.”

-सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के (अहिल्यानगर).

********************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .