भूगोलाची व्याप्ती मातीपासून ते उपग्रहापर्यंत!" - न्यू आर्ट्स पारनेर महाविद्यालयात 'जिओ फेस्ट' उत्साहात संपन्न.

पारनेर(प्रतिनिधी):- आजच्या युगात भूगोल हा केवळ नकाशापुरता मर्यादित राहिला नसून त्याची व्याप्ती आता माती ते उपग्रह अशी प्रचंड विस्तारली आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज आपल्या पायाखालच्या मातीच्या कणापासून ते अंतराळातील उपग्रहापर्यंतचा अभ्यास भूगोलात सामावलेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ भूगोल अभ्यासक प्रा. पांडुरंग चौधरी यांनी केले.

​पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या भूगोल विभागातर्फे आयोजित भूगोल दिन आणि जिओ फेस्ट  कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर होते.

      ​यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी जीवनाशी निगडीत भौगोलिक घटना आणि घडामोडींवर आधारित विविध पोस्टर्स आणि मॉडेल्सचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी साकारलेली कल्पक मॉडेल्स आणि विषयाची मांडणी पाहून उपस्थितांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.

      विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. चौधरी म्हणाले, पृथ्वीचा विचार करता भारत देश एका टिंबाप्रमाणे आहे आणि ब्रह्मांडाचा विचार करता पृथ्वी आकाशगंगेत एका टिंबाप्रमाणे आहे. या विशाल विश्वाचे आकलन करून देणारा भूगोल हा विषय इतर अनेक विषयांची जननी आहे. आधुनिक काळात जी.पी.एस. आणि जी.आय.एस. तंत्रज्ञानामुळे या विषयाला तांत्रिक दर्जा प्राप्त झाला असून, विद्यार्थ्यांनी या बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेतल्यास करिअरच्या अनंत संधी उपलब्ध आहेत.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विभागप्रमुख डॉ. रघुनाथ नजन यांनी बदलत्या काळानुसार भूगोल विषयात होत असलेल्या बदलांचा आढावा घेतला. ते म्हणाले, कोणतेही काम कमी प्रतीचे नसते. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयात प्रावीण्य मिळवणे आणि गुणवत्ता सिद्ध करणे आवश्यक आहे. अद्ययावत ज्ञानच विषयाची उंची वाढवते.

       अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी, भूगोलाचा संबंध जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी येतो. या विषयातील आधुनिक तंत्रज्ञान मानवी जीवनाला दिशा देणारे ठरत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता नवीन तांत्रिक बाबी आत्मसात करून वेगवेगळ्या क्षेत्रात संधी शोधल्या पाहिजेत, असे आवाहन केले.

        या कार्यक्रमात डॉ. दत्तात्रय घुंगार्डे यांनीही मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अशोक ठोकळ (संयोजक), प्रा. ज्योत्स्ना म्हस्के, प्रा. स्वप्नाली फापाळे यांच्यासह कला विभागातील डॉ. विजयकुमार राऊत, प्रा. प्रकाश गावित, प्रा. नितीन निपुंगे, डॉ. अशोक घोरपडे, प्रा. शामराव रोकडे यांच्यासह भूगोल विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योत्स्ना म्हस्के यांनी केले, तर आभार डॉ. अशोक ठोकळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात श्री. याकुब शेख, श्री. अशोक व्हरकटे व श्री. हर्ष दळवी यांनी परिश्रम घेतले.

*******************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.