माझी एक आठवण...महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व स्व.अजितदादांबद्दल...🙏
बारामती येथे २२ ते २४ डिसेंबर २०१२ या कालावधीत ९३ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. हे संमेलन प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी बारामतीची रंगीत विद्युत रोषणाई आणि भव्य तयारी लक्षवेधी ठरली होती. यासाठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष त्यावेळी नुकतेच परत सिंचन घोट्याळ्यात आरोप झाल्यावर राजीनामा दिल्यानंतर निर्दोष सुटल्यावर ७ डिसेंबर ला परत नव्याने उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा पवार हे होते. तर उदघाटक म्हणून केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब हे होते व प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब हे होते . साहित्य, नाट्य याची मला आवड असल्याने या कार्यक्रमासाठी जायचे असे मी व आमचे मित्र रमेश पवार सर, (बीड ) यांनी ठरवले . २२ डिसेंबरला शनिवार होता, शाळा सुटल्यावर नगर एसटी बस स्टँडवरुन एसटीने डायरेक्ट रात्रीचा प्रवास करून २३ डिसेंबरला रविवारी बारामती गाठले. पहाटेच एसटी स्टँडवरच सर्व प्रातःविधी, अंघोळ वगैरे उरकून बारामती येथील मोरोपंत मंडपात नाटय संमेलनास उपस्थित झालो व कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ लागलो. तिथेच पुस्तकाचे विविध स्टॉल होते व एक पुस्तक अजितदादांच्या जीवनावरील होते ज्याचे लेखक बीड जिल्ह्यातीलच सोपान गाडे हे होते व त्या पुस्तकाचे २४ डिसेंबरला प्रकाशन होणार होते. पण विक्रिसाठी ठेवले होते. त्यावेळी त्या लेखकांबरोबर बरीच चर्चा झाली. दादा कसे आहेत. बारामतीचा विकास कसा केला असे ते सांगत होते. आमचे मित्र बीड जिल्ह्यातील असल्यामुळे गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यावरही त्यांनी बोलायला सुरवात केली व त्यांच्यावरही पुस्तक लिहिणार असल्याचे सांगितले. आदरणीय अजितदादांबद्दल मी लहानपणापासून अनेक किस्से ऐकत होतो. स्व.मा. आमदार वसंतरावजी झावरे पाटील तर राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्या बरोबर अहिल्यानगर जिल्हातून पक्षात प्रवेश करणारे पहिले आमदार होते. तसेच सुजितदादा झावरे पाटील व अजितदादांचे अतिशय घनिष्ठ संबंध त्यावेळी होते . त्यामुळे त्यावेळी आदरणीय अजित दादांबद्दल मला खुप आदर, दरारा वाटायचा. मी त्या लेखकाचे अजितदादा पवार महाराष्ट्राच कणखर नेतृत्व हे पुस्तक विकत घेतले व आमचे मित्र रमेश पवार सर यांना म्हटले यावर अजितदादांची स्वाक्षरी (ऑटोग्राफ ) घेऊ. त्यावेळी अजितदादां भोवती ते उपमुख्यमंत्री असल्यामुळे कार्यकर्त्यांचा खुप गराडा असायचा व सुरक्षा व्यवस्था ही कडक होती. आमची तर कोणाबरोबर ओळखही नव्हती. फक्त एक रसिक म्हणून बारामतीत आलो होतो. मी म्हणालो चला गोविंद बागेत जाऊ तिथे भेटतील. पण तिथे गेल्यावर कळाले ते सहयोग कॉलनीत राहतात . मग आम्ही परत बारामतीत त्यांच्या निवासस्थानी सहयोग कॉलनीत आलो. घरी गेलो पण तिथेही ते नव्हते. परत माघारी संमलेन स्थळी आलो. त्यावेळी नेमके स्व . अजितदादा आले होते. प्रचंड कार्यकर्त्यांचा गराडा व सुरक्षा व्यवस्था. मी पुस्तक घेऊन त्या दिशेने गेलो. दादा गाडीत बसणारच होते. मी मोठ्याने आवाज दिला. ओ दादा... ओ दादा.. सगळे माझ्याकडे पाहायला लागले. दादाने मला जवळ बोलावून घेतले व काय काम आहे विचारले मी म्हटले काहीच नाही फक्त तुमच्या या चरित्र पुस्तकावर तुमची एक स्वाक्षरी द्या. त्यावेळी त्यांनी कुठुन आलात अशी आपुलकीने चौकशी केल्यावर मी मा. आ . वसंतरावजी झावरे पाटील यांच्या गावावरून नाट्य संमेलनाला आलो आहे असे सांगितले. त्यांनी त्या पुस्तकावर हार्दिक शुभेच्छा अजित पवार व खाली दिनांक टाकून त्यांच्या हस्ताक्षरात आवर्जुन स्वाक्षरी केली व गाडीत बसून निघून गेले ते पुस्तक मी आमचे मित्र रमेश पवार सर यांना वाचल्यानंतर भेट दिले. त्यांनी अजुनही ते पुस्तक आठवणीने जपून ठेवले आहे .काल ज्यावेळी दादांचे निधन झाले. मला तो प्रसंग आठवला. एका सामान्य माणसालाही आपुलकीने विचारपुस करणारे दादा.. आठवण आल्यावर आवर्जुन आमचे मित्र रमेश पवार सरांना फोन करून ते पुस्तक आहे का ? असे विचारल्यावर हो कालच अंमळनेर येथे जो श्रद्धांजली चा कार्यक्रम झाला तिथे हे पुस्तक मी घेऊन सर्वांना आपली आठवण सांगितली. तसेच पुस्तकातील प्रसंगही सांगितले त्यांची स्वाक्षरीही दाखविली. हे ऐकून नकळत माझ्या डोळ्याच्या कडा पाणवल्या ...
आदरणीय स्वर्गीय अजितदादा यांना भावपूर्ण श्रध्दांजली🙏
शब्दांकन - श्री.प्रमोद झावरे सर
(पारनेर)
*********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा