लेखक सासवडे यांना राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार
अहिल्यानगर: अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत, साहित्योत्सव अंतर्गत राज्यस्तरीय खुली साहित्य लेखन स्पर्धा नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. साहित्य पाठविण्यासाठी 12 फेब्रुवारी 2026 ही अंतिम मुदत दिलेली होती. ही स्पर्धा 20, 21, 22 फेब्रुवारी 2026 अशा तीन दिवसात पार पडली. या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून लेखक, कवी, नाट्यछटाकार यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला होता.
साहित्योत्सवाच्या कथा लेखन स्पर्धेत आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर गावचे लेखक अजिनाथ सासवडे यांच्या "मेटे मामा" या कथेसाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे असून त्याचे वितरण लवकरच करण्यात येईल. लेखक अजिनाथ सासवडे यांना यापूर्वी देखील अनेक राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच त्यांचे सुखाचा शोध नावाचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे.
********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा