भोयरे पठार जि.प. शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. कला आणि संस्कृतीचा अविस्मरणीय मिलाफ.
अहिल्यानगर(प्रतिनिधी):- तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा भोयरेपठार येथे "शाळेला गावाचा आधार , गावाला शाळेचा अभिमान" या ब्रीदवाक्यानुसार शिवजयंतीचे औचित्य साधत वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उदघाटन प्रसंगी कोल्हे साहेब मार्केट कमिटी, संचालक राजू शेठ आंबेकर, सरपंच बाबाजी टकले, उपसरपंच राजेश बोरकर, उद्योजक किशोर शेठ कदम, मेजर अशोक मुठे, गणेश शेठ मुठे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादाभाऊ कावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छावा गीतातील छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून उपस्थितांच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत , लोकनृत्य व सामाजिक संदेश देणाऱ्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे युवा नेते प्रतिकदादा शेळके यांनी शाळेला आवश्यक असणारी साऊंड सिस्टीम विद्यार्थ्यांना बक्षिसरूपाने भेट देत शाळेला भरघोस मदत केली .
त्याचबरोबर गावातील अशोक टकले, अमोल टकले, अशोक कदम, विजू टकले, सीताराम केदार, बबन साठे, अशोक उरमुडे, संदीप उरमुडे, शिवाजी उरमुडे, योगेश गाढे, बजरंग उरमुडे, रमेश उरमुडे, वृषाली उरमुडे, सुनिता बुचुडे , नरवडे सर, बोबडे सर आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख अंबादासजी गारुडकर साहेब, तसेच शिक्षक नेते राजेंद्र निमसे,शरद वांढेकर,बाळासाहेब कदम,संतोष ठाणगे, बाबा पवार, संजय दळवी, प्रकाश कार्ले, संदीप पवार, रघु जपकर, निमसे मॅडम , शेजुळ मॅडम, महापुरे मॅडम आदी शिक्षक आवर्जून उपस्थित होते.
उपस्थितांनी मुलांना दिलेल्या बक्षीस रूपाने शाळेच्या विकासाकरिता पंच्याऐंशी हजार रुपये इतका भरघोस निधी जमा झाला.लेफ्ट कर्नल बाळासाहेब बोरकर यांनी सीमेवरून कार्यक्रमासाठी निधी पाठवत शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापक श्री.पांडुरंग देवकर सरांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले. श्री दत्तात्रय जाधव सर यांनी सूत्रसंचालन केले तर श्री लाटे सर यांनी आभार मानले.
********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा