तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य-- स.पो.नि. गणेश वारुळे

.अहिल्यानगर (प्रतिनिधी):-  अहिल्यानगर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला भयमुक्त वातावरणात जीवन जगता येईल यासाठी विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे मत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी व्यक्त केले. 

नुकताच वारुळे यांनी पदभार स्वीकारला त्यामुळे कामरगावचे मा. सरपंच तुकाराम कातोरे, स्व: गोपोनाथ मुंडे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजाभाऊ पोटे, पिंपळगाव कौडा येथील युवा नेतृत्व संदीप कोल्हे, संभाजी गोरे यांच्या शिष्ट मंडळाने पोलीस स्टेशनला जाऊन सत्कार केला. यावेळी बीट हवालदार श्रीम. कुंदा रेपाळे उपस्थित होत्या अशी माहिती तुकाराम कातोरे यांनी दिली. 

सध्या तालुक्यात काही भागात लुटमाऱ्या, चोऱ्या, दरोडे अशा घटना घडत असतात. त्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. त्यानुसार अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात वाहने आडवून लुटमार करणाऱ्या एका टोळीला आठ दिवसापूर्वी जेरबंद केले आहे. या परिसरात अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यानुसार रात्रीच्या वेळी महामार्गावर फिरते गस्त पथक कार्यरत ठेवले जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला मदत करावी असे आवाहन वारुळे यांनी यावेळी केले.

शालेय आठवणीने वारुळे गहिवरले...

वारुळे यांचे प्राथमिक शिक्षण जि.प. केंद्र शाळा केडगाव येथे झाले त्यावेळी तुकाराम कातोरे त्यांना शिक्षक होते. त्या काळातील शाळेतील आठवणी निघताच वारुळे यांना गहिवरून आले व त्यांनी गुरुप्रती आदरभाव व्यक्त केला. कातोरे यांनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त केल्या.

********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, Follow व SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .