पोस्ट्स

एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीतील या आरोपीवर हद्दपारीची कारवाई !

इमेज
अहमदनगर:- एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीतील आरोपी नामे अंतोन शामसुंदर गायकवाड, रा. कातोरे वस्ती, नागापुर ता. जि. अहमदनगर यास दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्हयाचे स्थळसिमेचे हददीतुन दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आरोपी नामे अंतोन शामसुंदर गायकवाड, रा. कातोरे वस्ती, नागापुर ता. जि. अहमदनगर याचेविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे. १) एमआयडीसी पोस्टे गुरनं. १४७/२०१६ भादंवि कलम ३२६, ३५४,३२३, ५०४, ५०६ प्रमाणे (न्यायप्रविष्ठ) २) एमआयडीसी पोस्टे गुरनं २६४ / २०१६ भादंवि कलम ३२५, ३२४, ३८५, २०१, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे (न्यायप्रविष्ट) ३) एमआयडीसी पोस्टे गुरनं. १४९/२०१६ भादंवि कलम ३०९ प्रमाणे (न्यायप्रविष्ट) ४) एमआयडीसी पोस्टे गुरनं. ५२९/२०१६ भादंवि कलम ३९४ ३४ प्रमाणे (न्यायप्रविष्ट) ५) एमआयडीसी पोस्टे गुरनं. १४२/२०१७ भादंवि कलम ३८४, ५०४, ५०६ प्रमाणे ( न्यायप्रविष्ट ६) एमआयडीसी पोस्टे गुरनं. १२५/२०२२ भादंवि कलम ३०६, ३०२३, ३४ प्रमाणे (न्यायप्रविष्ट) ७) एमआयडीसी पोस्टे गुरनं. ६७३ / २०२१ भादंवि कलम ३२४ प्रमाणे (न्यायप्रविष्ट) ८) एमआयडीसी

भिंगार पोलिसाची बिंगो जुगार अड्ड्यावर कारवाई

इमेज
अहमदनगर:- भिंगार पोलिसा कडून बिंगो जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई मधे भिंगार शहरातील शुक्रवार बाजार येथे केलेल्या कारवाईत ११२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भिंगार पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे हे मुकुंदनगर या भागामध्ये पाहिजे असलेले आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमी मिळाली  की भिंगार शहरातील शुक्रवार बाजार येथे नेहरू मार्केटच्या पाठीमागे बि,गो  जुगार काही व्यक्ती पैसे लावून खेळवीत आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी तात्काळ पथक तयार केले त्यामध्ये सहाय्यक फौजदार वराट पोलीस अमलदार अजय नगरे, अमोल आव्हाड,राहुल द्वारके, सागर तावरे कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून दुपारी 2 वाजेच्या सुमारास शासकीय गाडीने पथक गोपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे भिंगार शहरातील शुक्रवार बाजार येथील नेहरू मार्केटच्या मागे सुरू असलेल्या बेगोजोगरावर धाड टाकली यावेळी विनोदसिंग कैलाससिंग परदेशी वय 38 राहणार एमजी रोड भिंगार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपीकडून भिंगार पोलिसांनी  यावेळी 11270 रुपयाचा मुद्देमा

कृषी, उद्योग, पर्यटनाबरोबरच विकासाच्या संधी असलेल्या क्षेत्रांना प्राधान्य देत जिल्ह्याचा सर्वसमावेशक असा विकास आराखडा तयार करा - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

इमेज
      अहमदनगर:- केंद्र शासनाने सन 2047 पर्यंत विकसनशील भारत निर्माणाचा संकल्प केला आहे.  विकसनशील भारत निर्माणामध्ये प्रत्येक राज्य व जिल्ह्याच्या अधिक प्रमाणात विकास होणे गरजेचे आहे. त्यानुसार   जिल्ह्याच्या विकासाचा सर्वसमावेशक असा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा विकास आराखडाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.सालीमठ बोलत होते.             यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, संबंधित विभागांचे विभाग प्रमुख, औद्योगिक संघटना प्रतिनिधी आदी उपस्थित होते.             जिल्हाधिकारी श्री.सालीमठ म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत "विकसित भारत करण्याचा संकल्प केंद्र शासनाकडून करण्यात आला आहे.  विकसित भारताची ही उद्दिष्टे साध्य करीत असताना भारतातील राज्यांना सुध्दा सन २०४७ पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. यादृष्टीने महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत

जिल्ह्यातील शितगृह उद्योगांना कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट

इमेज
सातारा ( प्रतिनिधी) - राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील शितगृह उद्योगांना भेटी देऊन या  उद्योगांमध्ये शेतकऱ्यांना जोडण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कृषि आयुक्त श्री चव्हाण यांनी सातारा एमआयडीसीतील भंडारी ॲग्रो इंडस्ट्रिज, खंडाळा येथील ज्योती कदम यांच्या शितगृहास भेट दिली. भेटी वेळी त्यांनी शितगृह व्यवसायाबद्दल  आणि साठवणूक करण्यात आलेल्या शेतमालाविषयी जाणून घेतले. तसेच मेगा फूड पार्क, सातारा येथेही त्यांनी भेट दिली व मेगा फूड पार्कचे व्हाईस प्रोसिडेंट विजयकुमार चोले यांच्याशी चर्चा केली. शेतकरी उत्पादक कंपन्यांना जोडण्याबाबत, शेतकरी उत्पादक कंपन्यांना फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग करण्याबाबत मार्गदर्शन केले.कृषि आयुक्त श्री. चव्हाण यावेळी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, सातारा येथे ईट राईट मिलेट मेला या कार्यक्रमासही उपस्थिती लावली व उपस्थितांना मानवी आहारात भरडधान्यांचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले.             यावेळी विभागीय कृषि सहसंचालक, कोल्हापूर बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, कृषि विकास अधिकारी विजय माईनकर, विभागीय कृषि अधिका

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

इमेज
नवी मुंबई, ( प्रतिनिधी) - वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गौरव केले  राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन २०२२ चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी श्री. शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठा

घोसपुरी गावच्या आजी माजी सैनिक संघटनेच्या प्रयत्नातून भव्य कमान साकार.

इमेज
  नगर ( प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील घोसपुरी येथील आजी-माजी सैनिक संघटनेच्या विशेष प्रयत्नातून साकार झालेल्या भव्य कमानीचे उदघाटन पद्मश्री पोपटराव पवार आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.         याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगर तालुक्यातील घोसपुरी गावामधे  आजी माजी संघटनेच्या विशेष प्रयत्नातून भव्य अशी कमान साकारण्यात आली. यावेळी घोसपुरी गावामधे शेकडो जनसमुदायाच्या उपस्थितीत मोठया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी  कारगिल योद्धा नायक दीपचंद्र पंचग्रामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत होते. तर पद्मश्री पोपटराव पवार व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते कमानीचे उदघाटन करण्यात आले. घोसपुरी येथील आजी माजी सैनिकांच्या विशेष प्रयत्नामधून घोसपुरी गावचे विशेष आकर्षण ठरणारी भव्य कमान साकारण्यात आली. सीमेवर देशाचे रक्षण करणारे जवान समाजाप्रती व गावाप्रती देखील आपले सामाजिक दायित्व तितक्याच कर्तव्य तत्परतेने निभावतात. हे घोसपुरी गावच्या आजी माजी सैनिकांनी दाखवून देत समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. तसेच जय जवान जय किसान हे ब्रीद वाक्य

*कृषी उत्पन्न बाजार कमिटी च्या कार्यालयातच शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन*.

इमेज
              नगर (प्रतिनिधि)- राज्य शासनाने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दरम्यान कांद्याला कमी भाव मिळाल्याने, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५०/- रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. सदर अनुदानाकरिता शेतकऱ्यांच्या सातबारावर ऑनलाईन कांदा पीक नोंद असणे आवश्यक असून, ही अट शासनाने घातली आहे. वास्तविक विचार केला तर अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत, तसेच अनेक गावांमध्ये रेंज नाही, तसेच काही ठिकाणी तर टॉवरच नसल्यामुळे ऑनलाइन पीक नोंद करणे शक्य होत नाही. त्यातच आजही अनेक गावे ऑनलाइन ने जोडली गेली नाहीत. आणि ज्या ठिकाणी रेंज आहे त्या ठिकाणी शेतकरी ऑनलाइन पीक नोंद करण्यासाठी गेले असता अनेक वेळा शासनाचे सर्वर डाऊन असते. त्यामुळे संबंधित वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज डाऊनलोड करता येत नाही. खरे तर शेतकऱ्याचे पिकाची नोंद करणे हे काम तलाठ्याचे आहे परंतु अनेक ठिकाणी तलाठी देखील आपल्या वेळेवर येत नाहीत. वास्तविक पाहता शासन एका बाजूने शेतकऱ्यांना कांदा अनुदान जाहीर करत आहे. आणि त्यातच अनेक जाचक अटींमुळे तसेच ई.पिक नोंद ही आजही जवळपास ९०% पेक्षा जास्त शेतकऱ्यांची झालेली नसल्यामुळे हवालदिल झालेला शेतकऱ्याला या

फॉलोअर