पोस्ट्स

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

इमेज
     नगर (प्रतिनिधी):- तालुक्यातील मौजे कामरगाव येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांनी शालेय विदयार्थ्याना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी याकरिता शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम राबविला.         याबाबत सविस्तर माहिती अशी की, कामरगाव येथील बालवाडी मधे 11 वर्ष व अंगणवाडीमधे 22 वर्ष सेवा केल्यानंतर सेवानिवृत्ती घेतलेल्या सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तसेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्याना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी. याकरिता दि 16 ऑगष्ट रोजी विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केले.        मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पाताई सोनवणे मागील 4 वर्षांपासून कै.रामचंद्र सोनवणे व मालनबाई सोनवणे या त्यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम कुठलाही गाजावाजा न करता तसेच कुठलाही प्रसिद्धी सोस न बाळगता  यशस्वीपणे राबवत आहेत.           कामरगाव जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी पुष्पाताई सोनवणे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. त्या

नगरमधे मराठा आरक्षण शांतता रॅलीची जय्यत तयारी.

इमेज
नगर (प्रतिनिधी):-   मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात १२ ऑगस्ट रोजी नगर येथे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली होणार आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगरची  ओळख आहे. अहमदनगर हा मराठा बहुल आहे.लाखो मराठे स्थायिक आहेत. नगरच्या रॅलीचे उत्कृष्ट नियोजन झाले असून दहा लाखाहून अधिक मराठे रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार नगरच्या रॅलीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे असणार आहेत:- - शहरात सर्वत्र भगवे झेंडे, स्वागत कमानी व कटआउट्स , फटाकड्यांची आतिषबाजी  - २५०० प्रशिक्षित स्वयंसेवक  -  पोलिसांचा तगडा बंदोबस्त  - पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था  -  ध्वनिक्षेपक -  LED स्क्रीनस्   - १० ॲम्बुलन्स व वैद्यकीय पदके *रॅलीचा मार्ग* केडगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून... पुढे लगेचच छत्रपती  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केडगावमध्ये अभिवादन करण्यात येईल. अर्चना हॉटेल चौकात पाटलांचे भव्य स्वागत होईल. कायनेटिक चौक येथून दुपारी १.००वाजता रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर सक्कर चौकातून पुढे शिवतीर्थावर छत्रपती श

उद्याच्या जगण्यासाठी आज वृक्षारोपण करणे महत्त्वाचे : एसपी राकेश ओला. 'स्नेहबंध'तर्फे पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण.

इमेज
पोलिस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण करताना पोलिस अधीक्षक राकेश ओला, स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे समवेत पोलिस उपअधीक्षक (गृह) हरीश खेडकर, उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक अनुजकुमार मडामे, पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू आदी. नगर (प्रतिनिधी):- सर्वत्र पर्यावरणाची हानी होणे सुरु आहे. त्यामुळे तापमान वाढतच आहे. मानवाला उद्याच्या जगण्यासाठी आज वृक्षारोपण करणे महत्त्वाचे झाले आहे. वृक्ष असतील तरच मानवजाती वाचणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बनवून ठेवा असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले. स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात मंगळवारी पोलिस अधीक्षक ओला यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी 'स्नेहबंध'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक (गृह) हरीश खेडकर, उपअधीक्षक अमोल भारती, राखीव पोलिस निरीक्षक अनुजकुमार मडामे, पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू, सहायक फौजदार मुसा, सहायक फौजदार अन्वर सय्यद आदी उपस्थित होते. ओला म्हणाले, दिवसेंदिव

कामरगाव इंग्लिश स्कूलचा ९२.३० टक्के निकाल.

इमेज
नगर (प्रतिनिधी):-  तालुक्यातील कामरगाव इंग्लिश स्कूल कामरगाव माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा मार्च २०२४ चा निकाल ९२.३०% लागला असून.  दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळविले असल्याचे विदयालयाकडून सांगण्यात आले. दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक - कु.संकपाळ माणसी संजय - ९०.८०% द्वितीय कमांक- कु साठे तेजस्विनी राजेंद्र - ८८.८०%  तृतीय कमांक - कु. पठाण अलिशा शब्बीर - ८८.२०% , चतुर्थ कमांक - चि. ठोकळ राज्यवर्धन अनिल-८७.५०% , 'पाचवा क्रमांक - चि. पवार शिवम राजेंद्र - ८५.४०% मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन भारत सर्व सेवा संघ पाचेगाव, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नलगे  व सचिव श्री. प्रकाश जाधव, कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे व  उपसरपंच पुजाताई लष्करे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालिका मंगलताई लक्ष्मण ठोकळ,  तसेच विविध कार्यकारी. सेवा सोसायटीचे, चेअरमन सुनिल चौधरी, व्हा.चेअरमन, सर्व संचालक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, साहेबराव ठोकळ, सर्व सदस्य. तसेच प्र मुख्याध्यापक महेश गोंगे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद य

स्नेहबंध'तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीची प्रतिमा जिल्हाधिकाऱ्यांना भेट ! अहमदनगर स्थापना दिनानिमित्त उपक्रम.

इमेज
(जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांना नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची प्रतिमा भेट देताना स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे.) नगर( प्रतिनिधी) - अहमदनगर शहराचा मंगळवारी ५३४ व्या स्थापना दिन. या निमित्त जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांना नवीन जिल्हाधिकारी इमारतीची प्रतिमा स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी भेट दिली. २८ मे १४९० रोजी 'कोटबाग निजाम' हा राजवाडा बांधून नगरची स्थापना झाली. मलिक अहमदशहा याने १४९० मध्ये सीना नदीकाठी वसाहत स्थापन केली. तेथेच अहमदनगर वसण्यास सुरवात झाली. अहमदशहाच्या नावावरूनच 'अहमदनगर' हे नाव पडले.  शहराचा स्थापना दिन साजरा करणारे अहमदनगर हे एकमेव शहर आहे. अहमदनगर स्थापना दिनानिमित्त स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे शहरातील ऐतिहासिक वास्तूंची प्रतिमा दरवर्षी भेट देतात. आजच्या स्थापना दिनानिमित्त शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची प्रतिमा जिल्हाधिकारी सालिमठ यांना भेट दिली. ही प्रतिमा पाहून जिल्हाधिकारी यांनी डॉ. शिंदे यांच्या फोटोग्राफीचे कौतूक केले.  डॉ. उद्धव शिंद

व्ही-आर बॉक्स डोळ्याला लावत घरी बसून फिरता येणार मतदान केंद्रामध्ये. स्वीप समितीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्रांतिकारी प्रयोगाचे देशाने केले कौतुक !

इमेज
अहमदनगर ( प्रतिनिधी) :- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशांनुसार अहमदनगर व शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी डॉ .अमोल बागुल,जिल्हा मतदारदूत यांच्या संकल्पनेतून मतदानाला जाण्याअगोदरच मतदान केंद्राच्या आतील रचना व मतदान प्रक्रियेचा क्रम समजण्यास सुलभ व्हावा म्हणून व्ही आर बॉक्स डोळ्याला लावत घरी बसून मतदान केंद्रामध्ये फिरता येणार आहे.      अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या मतदान प्रक्रियेत व्हर्चुअल रियालिटी म्हणजे आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाच्या प्रयोगाचे राज्य व देश पातळीवर कौतुक होत आहे. मतदान केंद्राचा एक मिनिटाचा थ्रीडी व्हिडिओ गुगल- मायक्रोसॉफ्ट व ॲपल टीचर डॉ.बागुल यांनी तयार केला असून तो मोबाईलमध्ये लावून व्ही आर बॉक्स व गिअरच्या माध्यमातून आपण बसल्या जागी मतदान केंद्राच्या आतील प्रवेश,मतदान अधिकारी क्रमांक एक , दोन , तीन व त्यांची कार्य तसेच वोटिंग कंपार्टमेंट, व्हीव्हीपॅट मशीन व निर्गमन प्रवेशद्वार आदी मतदानाच्या क्रमिक प्रक्रिया लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना जणू मतदान केंद्रातच आपण उभे आहोत की

मातोश्री वृद्धाश्रमात 'स्नेहबंध'तर्फे मतदार जनजागृती ; मतदान करणे म्हणजे संविधानाचा सन्मान राखणे : डॉ. उद्धव शिंदे*

इमेज
( मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक व महिलांशी संवाद साधून मतदानाबाबत जनजागृती करताना स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे.) नगर (प्रतिनिधी):- मातोश्री वृद्धाश्रमात 'स्नेहबंध'तर्फे मतदार जनजागृती अहमदनगर : वाईट, भ्रष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींचा संसदेतला, विधिमंडळातला भरणा रोखायचा असेल तर भारतीय संविधानातून घटनाकारांनी आपल्याला एक भेदक अस्त्र बहाल केलंय ते म्हणजे मतदान! मतदान करणे म्हणजे संविधानाचा सन्मान राखणे होय, असे स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले. विळद येथील मातोश्री वृद्धाश्रमात स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात आली. या वृद्धाश्रमात सुमारे ४५ वृद्ध पुरुष व महिला आहेत. दिलीप चोरडिया या वृद्धाश्रमाचे काम पाहतात. येथील वृद्धांशी स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. शिंदे यांनी संवाद साधला. त्यांनी या ज्येष्ठ पुरुष व महिलांना मतदानाबाबत विचारले असता त्यांनी आम्ही मतदानाला जातो, असे सांगितले. डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, राष्ट्रहितासाठी मतदान करायचं ..,  लोकशाहीचा सन्मानासाठी .,१०० टक्के करायच मतदान.., अस

फॉलोअर