पोस्ट्स

केडगाव-बायपास रस्त्यावर खुनी हल्ला करणारे आरोपी कोतवाली पोलीसांकडून काही तासात जेरबंद !

इमेज
नगर ( प्रतिनिधी):- मिळालेल्या माहितीनुसार दि.०८/०९/२०२४ रोजी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत केडगाव बायपास रस्त्यावर गुन्हयातील फिर्यादी नामे प्रतीक विलास चहाण रा. वडगाव गुप्ता, यास पैशाचे कारणावरुन केडगाव बायपास टोलनाका येथे फिर्यादी यांचे चहाचे टपरीवर येवुन आरोपीने फिर्यादीस तु सारखेच माझे वडीलांकडे पैसे का मागतो असे म्हणाला असता, फिर्यादी त्यांस म्हणाले की, माझे पैसे देवुन टाका व माझा हिशोब क्लिअर करा असे म्हणाला असता त्याचा राग आल्याने उर्वरीत आरोपींने फिर्यादीस लाकडी दांडके, दगड व प्लॅस्टीकची खुर्चीने जिवे ठार मारण्याचे उददेशाने मारहाण केली. सदर गुन्हयाची माहीती मिळताच सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना आरोपींचा शोध घेणेकामी सुचना देऊन रवाना केल्यानंतर अवघ्या काही तासांतच गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्हयातील आरोपी यांचा नगर शहरातील विविध उपनगरात शोध घेवुन आरोपीत नामे १) संदिप बाळासाहेब थोरात वय- ४२ वर्षे रा. साईनगर, भारत बेकरी मागे बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर २) कार्तीक संदिप थोरात वय १८ वर्षे रा. साईनगर,

ग्रीन लाइफ फाऊंडेशन व भानुदासजी कोतकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जि .प बुळेपठार व कुरणवस्ती या शाळांस शालेय साहित्य वाटप.

इमेज
  नगर( प्रतिनिधी):- ग्रीन लाइफ फाऊंडेशन, पुणे व भानुदासजी कोतकर फाऊंडेशन, केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि .प .प्रा .शा .बुळेपठार व  जि. प .प्रा.शा . कुरणवस्ती, ता . राहुरी, या दुर्गम, आदिवासी भागातील शाळांना दोन्ही फाऊंडेशनचे समन्वयक श्री अमोल पवार यांच्या हस्ते 31 ऑगष्ट रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये स्कूल बॅग, पॅड, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर आदींचा समावेश होता. सदर मदतीसाठी द युवा ग्रामीण पत्रकार  श्री.हेमंत साठे,अ.नगर  यांनी विशेष प्रयत्न केले. भविष्यात अधिकाधिक दुर्गम भागातील शाळांना मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे  आश्वासन फाऊंडेशनचे समन्वयक श्री . अमोल पवार यांनी दिले . या कार्यक्रमासाठी बुळे पठार येथील   शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  भाऊसाहेब बुळे रघुनाथ बुळे, मच्छिंद्र दुधवडे मोघा केदार, संजय केदार शिक्षक गणेश तांबे सर  ,संतोष नरसाळे सर,प्रमोद झावरे सर, नवनीत लोंढे सर, गणेश नांगरे सर, राजेंद्र खराबी सर आदी उपस्थित होते . बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882 बातम्या पाहण्यासाठी आपल्या यु ट्युब चॅनलला खालील लिंक वर क्लिक करुन SUBSCRIBE करा... https://you

उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजाळ यांची सुपा ग्रामपंचायतीस भेट ! शासकीय योजनांचा घेतला आढावा.

इमेज
  पारनेर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायतीस रविवारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी भेट दिली. मिळालेल्या माहिती नुसार यावेळी त्यांच्यासमवेत पंचायत समिती विस्तार अधिकारी दयानंद पवार, जगताप, मेहत्रे हजर होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजाळ यांनी जिल्हा परिषदेसह शासनाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला.       केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सामान्य जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना पीएम विश्वकर्मा योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य योजना, या योजनेअंतर्गत सुपा ग्रामपंचायतीने केलेल्या कामावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजाळ यांनी समाधान व्यक्त करत तळागाळातील लाभार्थ्यांना लाभ दिल्याबद्दल ग्रांमपचायत पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले. यावेळी सुपा ग्रामपंचायतच्या सरपंच मनीषा रोकडे यांनी मान्यवरांचे स्वागत करत ग्रामपंचायतीच्या कामाची माहिती दिली. केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी सुपा ग्रामपंचाय

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

इमेज
     नगर (प्रतिनिधी):- तालुक्यातील मौजे कामरगाव येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांनी शालेय विदयार्थ्याना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी याकरिता शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम राबविला.         याबाबत सविस्तर माहिती अशी की, कामरगाव येथील बालवाडी मधे 11 वर्ष व अंगणवाडीमधे 22 वर्ष सेवा केल्यानंतर सेवानिवृत्ती घेतलेल्या सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तसेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्याना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी. याकरिता दि 16 ऑगष्ट रोजी विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केले.        मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पाताई सोनवणे मागील 4 वर्षांपासून कै.रामचंद्र सोनवणे व मालनबाई सोनवणे या त्यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम कुठलाही गाजावाजा न करता तसेच कुठलाही प्रसिद्धी सोस न बाळगता  यशस्वीपणे राबवत आहेत.           कामरगाव जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी पुष्पाताई सोनवणे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. त्या

नगरमधे मराठा आरक्षण शांतता रॅलीची जय्यत तयारी.

इमेज
नगर (प्रतिनिधी):-   मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात १२ ऑगस्ट रोजी नगर येथे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली होणार आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगरची  ओळख आहे. अहमदनगर हा मराठा बहुल आहे.लाखो मराठे स्थायिक आहेत. नगरच्या रॅलीचे उत्कृष्ट नियोजन झाले असून दहा लाखाहून अधिक मराठे रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार नगरच्या रॅलीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे असणार आहेत:- - शहरात सर्वत्र भगवे झेंडे, स्वागत कमानी व कटआउट्स , फटाकड्यांची आतिषबाजी  - २५०० प्रशिक्षित स्वयंसेवक  -  पोलिसांचा तगडा बंदोबस्त  - पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था  -  ध्वनिक्षेपक -  LED स्क्रीनस्   - १० ॲम्बुलन्स व वैद्यकीय पदके *रॅलीचा मार्ग* केडगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून... पुढे लगेचच छत्रपती  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केडगावमध्ये अभिवादन करण्यात येईल. अर्चना हॉटेल चौकात पाटलांचे भव्य स्वागत होईल. कायनेटिक चौक येथून दुपारी १.००वाजता रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर सक्कर चौकातून पुढे शिवतीर्थावर छत्रपती श

उद्याच्या जगण्यासाठी आज वृक्षारोपण करणे महत्त्वाचे : एसपी राकेश ओला. 'स्नेहबंध'तर्फे पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण.

इमेज
पोलिस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण करताना पोलिस अधीक्षक राकेश ओला, स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे समवेत पोलिस उपअधीक्षक (गृह) हरीश खेडकर, उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक अनुजकुमार मडामे, पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू आदी. नगर (प्रतिनिधी):- सर्वत्र पर्यावरणाची हानी होणे सुरु आहे. त्यामुळे तापमान वाढतच आहे. मानवाला उद्याच्या जगण्यासाठी आज वृक्षारोपण करणे महत्त्वाचे झाले आहे. वृक्ष असतील तरच मानवजाती वाचणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बनवून ठेवा असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले. स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात मंगळवारी पोलिस अधीक्षक ओला यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी 'स्नेहबंध'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक (गृह) हरीश खेडकर, उपअधीक्षक अमोल भारती, राखीव पोलिस निरीक्षक अनुजकुमार मडामे, पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू, सहायक फौजदार मुसा, सहायक फौजदार अन्वर सय्यद आदी उपस्थित होते. ओला म्हणाले, दिवसेंदिव

कामरगाव इंग्लिश स्कूलचा ९२.३० टक्के निकाल.

इमेज
नगर (प्रतिनिधी):-  तालुक्यातील कामरगाव इंग्लिश स्कूल कामरगाव माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा मार्च २०२४ चा निकाल ९२.३०% लागला असून.  दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळविले असल्याचे विदयालयाकडून सांगण्यात आले. दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक - कु.संकपाळ माणसी संजय - ९०.८०% द्वितीय कमांक- कु साठे तेजस्विनी राजेंद्र - ८८.८०%  तृतीय कमांक - कु. पठाण अलिशा शब्बीर - ८८.२०% , चतुर्थ कमांक - चि. ठोकळ राज्यवर्धन अनिल-८७.५०% , 'पाचवा क्रमांक - चि. पवार शिवम राजेंद्र - ८५.४०% मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन भारत सर्व सेवा संघ पाचेगाव, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नलगे  व सचिव श्री. प्रकाश जाधव, कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे व  उपसरपंच पुजाताई लष्करे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालिका मंगलताई लक्ष्मण ठोकळ,  तसेच विविध कार्यकारी. सेवा सोसायटीचे, चेअरमन सुनिल चौधरी, व्हा.चेअरमन, सर्व संचालक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, साहेबराव ठोकळ, सर्व सदस्य. तसेच प्र मुख्याध्यापक महेश गोंगे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद य

फॉलोअर