ग्रीन लाइफ फाऊंडेशन व भानुदासजी कोतकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जि .प बुळेपठार व कुरणवस्ती या शाळांस शालेय साहित्य वाटप.

 


नगर( प्रतिनिधी):- ग्रीन लाइफ फाऊंडेशन, पुणे व भानुदासजी कोतकर फाऊंडेशन, केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि .प .प्रा .शा .बुळेपठार व  जि. प .प्रा.शा . कुरणवस्ती, ता . राहुरी, या दुर्गम, आदिवासी भागातील शाळांना दोन्ही फाऊंडेशनचे समन्वयक श्री अमोल पवार यांच्या हस्ते 31 ऑगष्ट रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये स्कूल बॅग, पॅड, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर आदींचा समावेश होता. सदर मदतीसाठी द युवा ग्रामीण पत्रकार  श्री.हेमंत साठे,अ.नगर  यांनी विशेष प्रयत्न केले. भविष्यात अधिकाधिक दुर्गम भागातील शाळांना मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे  आश्वासन फाऊंडेशनचे समन्वयक श्री . अमोल पवार यांनी दिले .

या कार्यक्रमासाठी बुळे पठार येथील   शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  भाऊसाहेब बुळे

रघुनाथ बुळे, मच्छिंद्र दुधवडे मोघा केदार, संजय केदार शिक्षक गणेश तांबे सर  ,संतोष नरसाळे सर,प्रमोद झावरे सर, नवनीत लोंढे सर, गणेश नांगरे सर, राजेंद्र खराबी सर आदी उपस्थित होते .


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882

बातम्या पाहण्यासाठी आपल्या यु ट्युब चॅनलला खालील लिंक वर क्लिक करुन SUBSCRIBE करा...https://youtu.be/ncZi7sF_HCI

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !