पोस्ट्स

शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोटींची फसवणूक करणारे सायबर भामटे गजाआड ! अहिल्यानगर सायबर पोलीसांनी आंतरराष्ट्रीय सायबर टोळीतील आरोपींना ठोकल्या बेड्या.

इमेज
अहिल्यानगर : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात १ कोटी १० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, भारतातील स्थानिक आरोपी परदेशातील गुन्हेगारांच्या मदतीने नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. फसवणुकीची व्याप्ती आणि पोलिसांचा तपास. २७ जानेवारी २०२५ रोजी फिर्यादीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती की, ऑक्टोबर २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत SMC Global Securities नावाने व्हॉट्सअॅपवरून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून २०-३० टक्के अधिक नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. या भूलथापांना बळी पडून फिर्यादीने १ कोटी १० लाख ८० हजार रुपये गुंतवले, मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण केले. यातून मिळालेल्या बँक खात्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी महावीर कांबळे (रा. गोटेवाडी, मोहोळ, सोलापूर) याला अटक केली. त्याच्या चौकशीतून आणखी तीन सा...

शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारा जेरबंद.

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शेअर मार्केटच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालणा-या आरोपीला काही तासातच चारचाकी वाहनाचा पाठलाग करुन जेरबंद करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी संभाजी भिमराज गाडेकर वय - 32 वर्षे, धंदा- हाँटेल व्यवसाय रा. माळेगाव ने ता.शेवगाव जि.अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी ए के नावाचे शेअर मार्केट ट्रेडींग नावाचे आँफीस रावतळे कुरुडगाव ता.शेवगाव जि. अहिल्यानगर येथे कंपनीच्या नावाखाली एकुण- 25 लाख 64 हजार रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- 95/2025 भादवि कलम -420,409,406,34 प्रमाणे दिनांक-03/02/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.   पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की,  नमुद गुन्ह्यातील आरोपी शिवाजी रावसाहेब बोरकर रा. थेरगाव ता.पैठण जि. छत्रपती संभाजीनगर हा थेरगाव येथे असल्याची बातमी मिळाल्याने तपासाची चक्रे वे...

नगर तालुक्यात सोयाबीन चोरणारे चोरटे मुद्देमालासह जेरबंद !* ; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई !

इमेज
  नगर (प्रतिनिधी):- अहिल्यानगर तालुक्यातील साकत येथे शेतकऱ्याच्या  गोठ्यातून सोयाबीन चोरी गेल्यामुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधे भीती निर्माण झाली होती. परंतु काही दिवसांतच नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या टीमने धडक कारवाई करत सोयाबीन चोरणारी टोळी जेरबंद केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी  की,  दिनांक १० ऑक्टोबर २४ रोजी फिर्यादी श्री.सतीश भानुदास कार्ले, वय ४१, रा.साकत, ता.अहिन्यानगर यांचे शेतातील जनावरांच्या गोठयातुन अज्ञात चोरटयांनी २३ सोयाबीनच्या गोण्या चोरी गेल्या होत्या. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ७७०/२०२४ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधिक्षक राकेश ओला.अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना चोरीचे उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते. नमुद आदेशा प्रमाणे पो.नि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पो.उपनि अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, राहुल सोळुंके, भाऊ...

स्पर्धांमुळे महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन : मुख्य कार्यकारी अधिकारी - विक्रांत मोरे ; स्नेहबंध फाउंडेशनतर्फे गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण .

इमेज
  (स्नेहबंध फाउंडेशनतर्फे गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना भिंगार छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, स्नेहबंध चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, भंडारी सप्लायर्सचे संचालक रुपेश भंडारी, सौ. शिल्पा भंडारी, सचिन पेंडुरकर, निशांत पानसरे.) नगर (प्रतिनिधी): - गौरी सजावट स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला. यानिमित्त अनेक महिलांना प्रोत्साहन मिळाले, असे प्रतिपादन भिंगार छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केले.  स्नेहबंध सोशल फाउंडेशन च्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.  याप्रसंगी स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, भंडारी सप्लायर्सचे संचालक रुपेश भंडारी, सौ. शिल्पा भंडारी, सौ. राजश्री शिंदे, साई ट्रॉफीजचे सचिन पेंडूरकर, निशांत पानसरे आदी उपस्थित होते.  मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे म्हणाले, प्रत्येक मातापित्यांनी मुलीला सक्षम बनवा, त्यापुढे जाऊन तिच्या प्रत्येक कार्यामध्ये माहेर आणी सासरकडून तिचे कौतुक करा, आज मुली आणि महिलांना कुटुंबातून प्रतिसाद मिळाल...

केडगाव-बायपास रस्त्यावर खुनी हल्ला करणारे आरोपी कोतवाली पोलीसांकडून काही तासात जेरबंद !

इमेज
नगर ( प्रतिनिधी):- मिळालेल्या माहितीनुसार दि.०८/०९/२०२४ रोजी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत केडगाव बायपास रस्त्यावर गुन्हयातील फिर्यादी नामे प्रतीक विलास चहाण रा. वडगाव गुप्ता, यास पैशाचे कारणावरुन केडगाव बायपास टोलनाका येथे फिर्यादी यांचे चहाचे टपरीवर येवुन आरोपीने फिर्यादीस तु सारखेच माझे वडीलांकडे पैसे का मागतो असे म्हणाला असता, फिर्यादी त्यांस म्हणाले की, माझे पैसे देवुन टाका व माझा हिशोब क्लिअर करा असे म्हणाला असता त्याचा राग आल्याने उर्वरीत आरोपींने फिर्यादीस लाकडी दांडके, दगड व प्लॅस्टीकची खुर्चीने जिवे ठार मारण्याचे उददेशाने मारहाण केली. सदर गुन्हयाची माहीती मिळताच सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना आरोपींचा शोध घेणेकामी सुचना देऊन रवाना केल्यानंतर अवघ्या काही तासांतच गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्हयातील आरोपी यांचा नगर शहरातील विविध उपनगरात शोध घेवुन आरोपीत नामे १) संदिप बाळासाहेब थोरात वय- ४२ वर्षे रा. साईनगर, भारत बेकरी मागे बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर २) कार्तीक संदिप थोरात वय १८ वर्षे रा. साईनगर, ...

ग्रीन लाइफ फाऊंडेशन व भानुदासजी कोतकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जि .प बुळेपठार व कुरणवस्ती या शाळांस शालेय साहित्य वाटप.

इमेज
  नगर( प्रतिनिधी):- ग्रीन लाइफ फाऊंडेशन, पुणे व भानुदासजी कोतकर फाऊंडेशन, केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि .प .प्रा .शा .बुळेपठार व  जि. प .प्रा.शा . कुरणवस्ती, ता . राहुरी, या दुर्गम, आदिवासी भागातील शाळांना दोन्ही फाऊंडेशनचे समन्वयक श्री अमोल पवार यांच्या हस्ते 31 ऑगष्ट रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये स्कूल बॅग, पॅड, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर आदींचा समावेश होता. सदर मदतीसाठी द युवा ग्रामीण पत्रकार  श्री.हेमंत साठे,अ.नगर  यांनी विशेष प्रयत्न केले. भविष्यात अधिकाधिक दुर्गम भागातील शाळांना मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे  आश्वासन फाऊंडेशनचे समन्वयक श्री . अमोल पवार यांनी दिले . या कार्यक्रमासाठी बुळे पठार येथील   शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  भाऊसाहेब बुळे रघुनाथ बुळे, मच्छिंद्र दुधवडे मोघा केदार, संजय केदार शिक्षक गणेश तांबे सर  ,संतोष नरसाळे सर,प्रमोद झावरे सर, नवनीत लोंढे सर, गणेश नांगरे सर, राजेंद्र खराबी सर आदी उपस्थित होते . बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882 बातम्या पाहण्यासाठी आपल्या यु ट्युब चॅनलला खालील लिं...

उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजाळ यांची सुपा ग्रामपंचायतीस भेट ! शासकीय योजनांचा घेतला आढावा.

इमेज
  पारनेर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायतीस रविवारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी भेट दिली. मिळालेल्या माहिती नुसार यावेळी त्यांच्यासमवेत पंचायत समिती विस्तार अधिकारी दयानंद पवार, जगताप, मेहत्रे हजर होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजाळ यांनी जिल्हा परिषदेसह शासनाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला.       केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सामान्य जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना पीएम विश्वकर्मा योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य योजना, या योजनेअंतर्गत सुपा ग्रामपंचायतीने केलेल्या कामावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजाळ यांनी समाधान व्यक्त करत तळागाळातील लाभार्थ्यांना लाभ दिल्याबद्दल ग्रांमपचायत पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले. यावेळी सुपा ग्रामपंचायतच्या सरपंच मनीषा रोकडे यांनी मान्यवरांचे स्वागत करत ग्रामपंचायतीच्या कामाची माहिती दिली. केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यास...

फॉलोअर