पोस्ट्स

पळवे ग्रामपंचायतची ग्रामसभा ठरली वादळी. ग्रामपंचायत भक्षक की रक्षक...ग्रामस्थांचा आरोप ?

इमेज
  पारनेर (प्रतिनिधी) :-     मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील पळवे बुद्रुक येथे मंगळवारी (दि. २३) झालेली ग्रामसभा प्रचंड वादळी ठरली. याबाबत विविध नामांकित वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी ग्रामस्थांकडून घेतलेल्या सह्यांचा वापर थेट 'खडी क्रेशर' प्रकल्पासाठी ना हरकत दाखला (NOC) मिळवण्याकरीता करण्यात आल्याचा  धक्कादायक प्रकार सभेत उघडकीस आला असल्याची माहिती मिळाली.        प्राप्त माहितीनुसार या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता वर्तवण्यात येत असून, सुमारे ९५ टक्क्‌यांहून अधिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार, माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवलेल्या माहितीत ग्रामपंचायतीने खडी क्रेशर मालकाला दिलेल्या एनओसीसोबत पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी घेतलेल्या सह्यांचे कागदपत्र जोडल्याचे स्पष्ट झाले असल्याचे तसेच. आम्ही आमच्या पिकांच्या नुकसानीसाठी सह्या केल्या होत्या, क्रेशर प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी नव्हे, अशी संतप्त प्रति...

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेली बॉम्बची धमकी अफवाच.

इमेज
  ​अहिल्यानगर (प्रतिनिधी: अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आज सकाळी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने केलेल्या सखोल तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज आता पूर्णपणे सुरळीत सुरू झाले आहे. ​आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयास धमकीचा ईमेल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीने पोलीस विभागाला याची माहिती दिली. खबरदारीचा उपाय व‌ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी संपूर्ण कार्यालय परिसर रिकामा केला. बॉम्ब शोधक पथकातील 'लुसी' व 'जंजीर' या श्वानांच्या मदतीने तसेच अत्याधुनिक बॉम्ब शोधक यंत्रणेद्वारे कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्व मजले, जिने, लिफ्ट, पार्किंग व संपूर्ण परिसराचा समावेश होता. या शोधमोहिमेत अग्निशमन दल व एसआयडी (SID) पथकाचेही सहकार्य लाभले.  ​या सखोल शोधमोहिमेत कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आली नाहीत. परिसराची सुरक्षितता सुनिश्चित केल्यानंतर दुपारी कार्यालयाचे दैनंदिन कामकाज पुन्हा पूर्ववत सु...

रस्त्यावरच पोलांचे साम्राज्य ! सोलर प्रकल्पाच्या बेफिकीर कामामुळे ग्रामीण जीवन विस्कळीत; ग्रामस्थांचा संताप ?

इमेज
चिचोंडी पाटील/ बाळासाहेब गदादे:- मिळालेल्या माहितीनुसार, नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सोलर कंपनीने प्रकल्पातील लाईनसाठी ग्रामीण रस्त्यालगतच पोल उभारण्याचा गोंधळ उडवणारा पद्धतशीर उपद्व्याप सुरू केले असून, शेतकरी आणि ग्रामस्थ या कामावर संतप्त आहेत. ग्रामीण भागातील साधे, सोयीचे आणि दैनंदिन वाहतुकीसाठी आवश्यक रस्ते हे आता लोखंडी पोलांनी व्यापले असून, जनावरांची ने-आण, ट्रॅक्टरची वाहतूक, पीक काढणी, औजारे वाहतूक — अशा सर्व व्यवहारात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्रामस्थ या परिस्थितीवर संताप व्यक्त करत म्हणत आहेत की, “हा रस्ता आहे की सोलर प्रकल्पाचा प्लॉट? गावाच्या जीवनवाहिनीवरच हा प्रकल्प कब्जा करत आहे.” या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे सोलर कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) अधिकृत परवानगी घेतली आहे की नाही. या संदर्भात प्रशासनाकडून कोणताही स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांचा संशय अधिकच गडद होत आहे. गावकऱ्यांचे मत आहे की हा प्रकार तपासा...

सबस्टेशनला कनेक्शन नाही; तरीही मीटर बसले! सांडवे सौर प्रकल्पात अनियमिततेचा वास; शेतकऱ्यांचा रोष ?

इमेज
चिचोंडी पाटील/बाळासाहेब गदादे:- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपकेंद्राच्या हद्दीत सांडवे गावातून सुरु असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लाईन जोडणीच्या कामावर गंभीर शंका आणि अनियमिततेची काळी छाया पसरत आहे. अजून कोणत्याही प्रकारची वीज जोडणी न झालेली असतानाच ‘इन व आउट गोईंग’ मीटर सबस्टेशनमध्ये बसवण्यात आल्याने गावकऱ्यांच्या मनात संशयाची धग पेट घेत आहे. उपकेंद्राशी कोणताही प्रत्यक्ष कनेक्शन नसताना मीटर बसवण्याची इतकी घाई कशासाठी? मीटर कोणत्या ऊर्जेचे मोजमाप करणार? ही कारवाई तांत्रिकदृष्ट्या अशक्य असतांनाच केली गेल्याने प्रकल्पात काहीतरी ‘गोलमाल’ किंवा कागदोपत्री दाखवण्यासाठीची बनावट कार्यवाही सुरू असल्याची शंका ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. तसेच या प्रकल्पाचे आणखी एक गंभीर रूप म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्यांची परवानगी न घेता पोल रोवणे. काही जमिनमालकांनी या कामाला तोंडी विरोध दर्शवला; तरीदेखील त्यांच्या हरकतीकडे दुर्लक्ष करून प्रकल्प व्यवस्थापनाने जबरदस्तीने पोल उभारण्यात आले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी या प्रकाराबाबत लेखी तक्रार हि केली परंतु तक्रारीनंतरही कोणताही अधिकारी शेतात पाहणीस आला नाही...

कामरगाव येथील मातोश्री सिताबाई काजळे कन्या छात्रालयात मुलींना गणवेश वाटप.

इमेज
  अहिल्यानगर/प्रतिनिधी:-  श्री सद्‌गुरु सेवा मंडळ पुणे संचलित, मातोश्री सिताबाई काजळे कन्या छात्रालय कामरगाव येथील मुलींच्या वसतिगृहात कै.हभप बबन महाराज कळसकर यांचा 32 वा पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृह उभारणीकरीता महत्वाचे योगदान दिलेले मा.आरोग्य अधिकारी बापूसाहेब शेळके हे होते.  तर सामाजिक कार्यकर्ते हाबू शिंदे, मा.सरपंच तुकाराम कातोरे गुरुजी, मा.मुख्याध्यापक सुदाम ठोकळ, सेवानिवृत्त  शिक्षक साहेबराव ठोकळ, पत्रकार हेमंत साठे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. वसतिगृहातील मुलींनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच कै ह.भ.प. बबन महाराज कळसकर यांच्या कार्याबददल माहिती दिली.  मान्यवरांनी या कार्यक्रमप्रसंगी आपल्या मनोगतातून वस‌तिगृहाकरिता मदत करण्याचे आश्वासन दिले. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते वसतिगृहातील मुलींना व कर्मचाऱ्यांना संस्थेकडून गणवेश वाटप करण्यात आले. वसतिगृहाच्या अधिक्षिका श्रीमती फुलाबाई कानवडे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे मार्गदर...

एआय आधारित बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कारवाई – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर जिल्हा व्याघ्र कक्ष समितीची बैठक संपन्न

इमेज
  अहिल्यानगर/ प्रतिनिधी:दि. २८ – जिल्ह्यात वाढत्या मानव–बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एआय आधारीत बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या. ते जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत बोलत होते. बैठकीस उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, समितीचे सदस्य सचिव व विभागीय वनअधिकारी (दक्षता) नाशिक डॉ. अजित साजणे, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, गणेश मिसाळ, सौ. अश्विनी दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, दादासाहेब वाघुलकर, मानद वन्यजीव रक्षक मंदार साबळे, पोलीस निरीक्षक सुधाकर कुहाडे व किरणकुमार कबाडी (स्थानिक गुन्हे शाखा) आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्री. घार्गे म्हणाले, वनविभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पोलिसांकडून शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच मानव–बिबट्या संघर्षाबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांच्या विविध गावांतील व्हॉट्सअ‍ॅप गटांमध्ये वनअधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. वन्यप्राणी अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ ओळखणे, तसेच अस्...

सुप्यात वाहतूक कोंडीचा कहर ! अहिल्यानगर- पुणे महामार्गावर आपत्कालीन सेवांवर परिणाम.

इमेज
  अहिल्यानगर  (प्रतिनिधी): अहिल्यानगर–पुणे महामार्गावरील सुपा परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस भीषण रूप धारण करत आहे. सुपा गाव ते टोल नाका परिसरापर्यंत वाहतुकीची सततची कोंडी आता नागरिक, प्रवासी, उद्योगधंदे तसेच रुग्णवाहिकांसाठी मोठ्या संकटाचे रूप घेत आहे. *प्रमुख कारणे : रस्त्यावर पार्किंग व अतिक्रमण.* सुपा बाजारपेठ परिसरात प्रसिद्ध बेकरी पदार्थांसाठी वाहनांची मोठी गर्दी होत असून अनेक बेशिस्त वाहन चालक रस्त्यातच गाड्या उभ्या करतात. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही मिनिटांतच ठप्प होते. मध्यंतरी अहिल्यानगर–पुणे महामार्गालगत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमण वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. *एमआयडीसी पोलिस स्टेशनकडे नागरिकांचा आक्षेप.* सुपा एमआयडीसी पोलिसांनी या वाहतूक कोंडीवर ठोस भूमिका घेत नसल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे.महामार्गावर सतत वाढणाऱ्या वाहनसंख्येचा विचार करता येथील वाहतूक नियोजन अपुरे असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. आपत्कालीन सेवा धोक्यात आज (दि. २७ मे) एका प्रवाशाने ११२ आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितल्यानंतर...

फॉलोअर