सीएसआर कनेक्ट कॉनक्लेव २०२६ परिषद उत्साहवर्धक वातावरणात संपन्न. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया सिईओ आनंद भंडारी यांचे जिहयात मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सीएसआर संस्थाना आवाहन.
अहिल्यानगर ( हेमंत साठे):- सीएसआर ही समाजाभिमुख विकासासाठीची प्रभावी साधनयोजना आहे. जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक व मानवी विकास निर्देशांक उंचावण्यासाठी उद्योग व सीएसआर संस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या गरजेनुसार व प्राधान्यक्रमानुसार निधीचे लक्ष्यित नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. जिल्ह्यातील विविध विकासात्मक गरजांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा नियोजनबद्ध, समन्वयित व परिणामकारक वापर व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 'सीएसआर कनेक्ट कॉनक्लेव २०२६' परिषदेत डॉ. आशिया बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा नियोजन अधिकारी तथा परिषदेचे सदस्य सचिव दीपक दातीर, रमेश कासार, रोटरीचे डॉ. विनोद मोरे, क्षितिज झावरे, मर्लिन इलिशा, एव्हॅंजेलिन एलिशा, महेश गोपाळकृष्णन, तुषार देशमुख, सारिका मोरे, सुजाता उबाळे, हिरा मोतीयानी आदी उपस्थित होते. जि...