अॅड महेश शेडाळे राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार पदी तर अॅड गजानन फुंदे अहिल्यानगर जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी नियुक्ती.

अहिल्यानगर(प्रतिनिधी):- दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेच्या राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार पदी महेश शेडाळे  तर गजानन फुंदे अहिल्यानगर जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी यांची नियुक्ती  करण्यात आली असून, त्यांना दक्ष पोलीस मित्र संस्थेचे अध्यक्ष संस्थापक शहादेव मुंगसे  यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे,प्रहार संघटनेचे  परसराम जगधने, पत्रकार शिवहारी म्हस्के रफिक शेख आदी उपस्थित होते. यावेळी महेश शेडाळे राष्ट्रीय कायदेशीर सल्लगार पदी तर गजानन फुदे यांची अहमदनगर जिल्हा कायदेशीर सल्लगार पदी निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमास पोलीस यंत्रनेस मदत करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे यांनी सांगितले, शेवटी परसराम जगधने यांनीं उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.