*भोयरे पठार जि.प.शाळेतील बालचमुंनी भरवला आनंदी बाजार.*

अहिल्यानगर(प्रतिनिधी):- शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी जि. प. प्राथमिक शाळा भोयरे पठार येथे सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत चिमुकल्यांच्या बालआनंद मेळाव्याचे अर्थात 'आनंदीबाजार' या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ माजी सैनिक - आनशाबापू उरमुडे तसेच अशोक मुठे - अध्यक्ष आजी माजी सैनिक संघटना भोयरे पठार यांनी केले.*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माजी सैनिक आनशाबापू उरमुडे होते. तसेच या कार्यक्रमासाठी मा .उपसरपंच श्री.राजेश बोरकर , सामाजिक कार्यकर्ते डॉ.अमोल टकले , माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्री.बबन साठे , शाळा व्यवस्थापन समिती चे माजी अध्यक्ष श्री.विजय टकले व श्री.सीताराम केदार , व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.दादाभाऊ कावरे ,उपाध्यक्ष श्री.बाळू उरमुडे तसेच व्यवस्थापन समिती सदस्य व शाळेबद्दल नेहमीच आपुलकी ठेवणारे श्री.अशोक कदम, श्री. मनोहर गाढे, श्री. शाहरुख शेख, श्री. रमेश उरमुडे , श्री. शिवाजी मुठे, श्री. अमोल उमाप , श्री. संदीप आंबेकर, श्री. संदीप उरमुडे, श्री.राजेंद्र आंबेकर ,भाग्योदय विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कार्ले सर व सर्व शिक्षक वृंद, आजी माजी सैनिक संघटनेचे सदस्य श्री. उरमुडे मेजर, श्री आंबेकर मेजर यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच बालकांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

*विद्यार्थ्यांना गणितीय क्रियांचा सराव व्हावा, नफा तोटा या संकल्पना समजाव्या,व्यवहार ज्ञान व्हावे, नाणी नोटा यांची ओळख व्हावी, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी, प्रत्यक्ष व्यवहारज्ञानाचा जीवनात उपयोग व्हावा या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक श्री. देवकर सर यांच्या संकल्पनेतून या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.*

*यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थांनी विविध प्रकारचे स्टॉल मांडले होते, यामध्ये विद्यार्थ्यांनी शेतातील भाजीपाला, शालेय उपयोगी वस्तू,किराणा, कडधान्य,ओली भेळ, मिठाई, साऊथ इंडियन डिश ( इडली), चहा कॉफी असे विविध स्टॉल चा समावेश होता. विविध स्टॉलवरील वस्तू खरेदी करण्यासाठी गावातील महिला, पालक यांनी एकच गर्दी केली होती.तसेच भाग्योदय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला .सुट्या पैशांची अडचण होवू नये म्हणून काही स्टॉलधारकांनी ग्राहकांसाठी डिजिटल स्कॅनर (फोन पे )उपलब्ध करून दिले होते.यावेळी गावातील पालक, महिला, जेष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

*विद्यार्थ्यांच्या आनंदी बाजारातून सुमारे 8 ते 10 हजार रुपयांची उलाढाल झाली.*

*आजी माजी सैनिक संघटना भोयरे पठार चे अध्यक्ष अशोक मुठे यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून संघटनेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना आय कार्ड देण्याचे आश्वासन दिले. त्याबद्दल शाळा आजी माजी सैनिक संघटनेची सदैव ऋणी राहील.

*विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञानदेखील गरजेचे आहे यासाठी अशा उपक्रमाचे अनन्यासाधारण महत्व असल्याचे प्रतिपादन गावचे मा.उपसरपंच श्री. राजेश बोरकर यांनी केले.*

*विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम होणे गरजेचे असल्याचे मत अशोक मुठे, अध्यक्ष आजी माजी सैनिक संघटना भोयरे पठार यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक श्री.देवकर सर तसेच सहकारी शिक्षक श्री.लाटे सर, श्री.नरवडे सर व श्री.बोबडे सर तसेच माता पालक, तरुण,माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादाभाऊ कावरे यांनी सर्वांचे आभार मानले.*

********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.